‘पिंक’ या सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अॅक्शनपॅक सिनेमा करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नाम शबाना’ या तिच्या आगामी सिनेमात ती गुंडांसोबत दोन हात करताना दिसणार आहे. तापसीने या सिनेमातल्या अॅक्शनसाठी फार मेहनत घेतली आहे. तापसीने सांगितले की, या सिनेमात अॅक्शन सिक्वेन्स करताना तिला फार कठिण गेलं नाही.

याचं संपूर्ण श्रेय ती तिच्या प्रशिक्षकांना देते. या सिनेमासाठी हॉलिवूड स्टंटमॅन आणि स्टंट दिग्दर्शक सीरील रोफेलीने तापसीला प्रशिक्षण दिले आहे. तापसीच्या मते, राफेलीने तिला उत्तर प्रकारे स्टंट कसे करतात हे शिकवले. ज्याचा उपयोग तिला ‘नाम शबाना’ या सिनेमात झाला.

राफेलीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता या प्रश्नावर तापसी म्हणाली की, ‘मला नेहमीच स्टण्ट असणारे सिनेमे करायला आवडतात. पण अशी दृश्य चित्रित करणं फार कठीण असतं. पण कठीणला सोपं करणं मला राफेलीने शिकवलं. तो उत्तम स्टंट दिग्दर्शकच नाही तर उत्तम शिक्षकही आहे. त्याला माहित आहे की, कोणत्याही व्यक्तिला प्रोत्साहित कसं करायचं, त्याला कणखर कसं बनवायचं. त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे.’

तापसीने या सिनेमाला तिच्या या वर्षीच्या खास सिनेमांपैकी एक सांगितले आहे. या सिनेमातल्या अॅक्शन दृश्यांचे चित्रिकरण मलेशियामध्ये झाले. या सिनेमात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराची भूमिका करताना दिसेल. या सिनेमाचे चित्रिकरण सध्या सुरु असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

Story img Loader