अभिनेत्रीने शेअर केलेल्या बिकिनी फोटोची सोशल मीडियावर चर्चा

पाहा फोटो..

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ताराने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवला गेली होती. आता तिने सोशल मीडियावर बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे.

नुकताच ताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ताराने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून ती समुद्र किनारी उभी असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA (@tarasutaria)

तारा तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती गेल्या काही दिवसांपासून आदर जैनला डेट करत आहे. ताराने आदरच्या वाढदिवशी काही फोटो शेअर करत ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. त्या नंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते दोघे मालदीवला सुट्यांचा आनंद घेत आहेत. तारा तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tara sutaria bikini look avb