scorecardresearch

‘गन्स अँड गुलाब’चा टीझर प्रदर्शित, अभिनेता राजकुमार राव दिसणार वेगळ्या भूमिकेत

ही सिरीज म्हणजे एक डार्क कॉमेडी वेब सिरीज आहे.

‘गन्स अँड गुलाब’चा टीझर प्रदर्शित, अभिनेता राजकुमार राव दिसणार वेगळ्या भूमिकेत

अभिनेता राजकुमार राव हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता लवकरच तो नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे आणि तेही वेब सिरीजमधून. ‘गन्स अँड गुलाब’ असे या वेब सिरीजचे नाव आहे. नुकताच या सिरीजचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर सोशल मिडीयावर भरपूर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

ही सिरीज म्हणजे एक डार्क कॉमेडी वेब सिरीज आहे. राजकुमारबरोबरच अभिनेता दुलकर सलमान देखील दिसणार आहे. नेटफ्लिक्सच्या या वेब सीरिजचा टीझर खूपच दमदार आहे. टीझरमध्ये, राजकुमार राव कोणावर तरी हल्ला करताना दिसत आहे, तर व्हॉईस-ओव्हर कोणाची काळी बाजू बाहेर येता कामा नये असे ऐकू येत आहे.

या सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. या टीझरमध्ये जुन्या हिंदी चित्रपटांचा भास होत आहे. या सिरीजमध्ये गुलशन देवय्या आणि आदर्श गौरव देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये दुलकर सलमान आणि गौरवची झलकही पाहायला मिळत आहे.
राजकुमार रावने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. कमेंट्स करत चाहते राजकुमारला शुभेच्छा देत आहेत.

आणखी वाचा : राजकुमार रावने खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान घर, अभिनेत्रीला झाला ‘इतक्या’ कोटींचा नफा

राजकुमार राव शेवटचा ‘हिट: द फर्स्ट केस’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट याचं नावाच्या साऊथच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. त्यामुळे चाहत्यांना राजकुमारच्या या सिरीजकडून खूप अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या