बॉलिवूड कलाकारांना प्रत्यक्षात भेटण्याची अनेकांची इच्छा असते. कलाकारांचे चाहते त्यांना भेटण्यासाठी चक्क घरातून पळाल्याचे आपण अनेकदा ऐकलंय. अशीच एक घटना नुकतीच समोर आलीये. रायपूरची एक टीनेजर मुलगी बॉलिवूड अभिनेता वरूण धवनला भेटण्याच्या इच्छेने आपल्या घरातून पळाली. अदिती सुरैना नावाच्या या मुलीला काही पोलिसांनी कांजूरमार्गमध्ये पाहिलं आणि घटनेची चौकशी केली. या घटनेचा सर्वांत चांगला भाग असा होता की पोलिसांनी त्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वरूणसोबत तिची मीटिंगसुद्धा फिक्स केली. ‘डीएनए’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार, वरूण धवनने मुलीला जवळपास एक तास हीच गोष्ट समजावली की तिने जे केलंय त्याचे गंभीर परिणामसुद्धा झाले असते. तर अदिती आपल्या चाहत्या अभिनेत्याला भेटून खूप खूश झाली.

या घटनेचा पाठलाग करणाऱ्या नेत्या प्रिती शर्मा मेननने याबाबत ट्विट केलं. ट्विटमध्ये प्रिती शर्मा मेननने म्हटलं की, ‘मदत आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. अदितीला अखेर आम्ही शोधलं. पोलिसांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे खूप आभार. या घटनेवरून आज मला हेही समजलं की वरूण धवन आणि त्याचे आईवडील खूप चांगले लोक आहेत.’

varun-dhawan-with-fan

PHOTOS: प्रेयसी दिशासाठी टायगर सरसावला

अभिनेता वरूण धवन लवकरच ‘जुडवा २’ चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतीच त्याने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये आलिया भट्टसोबत भूमिका साकारली. वरूण आणि आलियाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात पुढच्या वर्षी होणार असं म्हटलं जातंय. दिग्दर्शक डेविड धवन आपला मुलगा वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नूसोबत ‘जुडवा २’ चित्रपट बनवणार आहेत. यामध्ये सलमान आणि करिश्मा कपूर पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसतील.