‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

रानबाजार या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तेजस्विनी सिगरेट ओढताना दिसत आहे. त्यानंतर ती तिचे कपडे काढताना दिसते. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याचे दिसते. हा टीझर शेअर करत “एकदा लोकांची सेवा करून पाहिली…, एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला…, एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…, सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय १८ मे ला!” असे कॅप्शन दिले आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Narendra Modi opinion that textile industry is important in developed India
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

या वेबसीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, “आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षयला वाटला. आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.”

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसीरिजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसीरिज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.