scorecardresearch

“एवढंच गरजेचं आहे”, सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट चर्चेत

सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर सक्रिय असतो.

“एवढंच गरजेचं आहे”, सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट चर्चेत
(Photo-Sidharth Chandekar/Instagram)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. आन्हिनाय बरोबरच सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो अनेक पोस्ट शेअर करत असतो, तसंच त्याच्या प्रत्येक पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना नेहमीचं काही ना काही माहिती मिळत असते, ही माहिती चाहत्यांच्या पसंतीस देखील पडते. मात्र सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिद्धार्थने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टद्वारे तो त्याच्या चाहत्यांना काळजीने प्रश्न विचारताना दिसत आहे. तो त्याच्या चाहत्यांना “सगळं नीट आहे ना?, कधी वाटलं तर भेटायला ये किंवा मला बोलावं मी येईन.” असेही सांगत आहे. या पोस्टला सिद्धार्थने “एवढंच गरजेचं आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टला प्रेक्षकांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टसाठी त्याला हजारात लाइक्स मिळत आहेत. यावार अनेक नेटकरी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लहील “खर आहे”. दुसरा युजर म्हणाला, “प्रेमाचे दोन शब्द जरी बोले तरी बरं वाटते , कुठे तरी दुखावले मन खुश होते.” सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

sidharth-chanekar-post
(Photo-Siddharth Chandekar/ Instagram)

दरम्यान सिद्धार्थ चांदेकर स्टार प्रवाहावरील “सांग तू आहेस ना ?” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तसच सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. तसंच तो आणि अभिनेत्र पर्ण पेठे यांची ‘अंधातरी’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या