‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कड गरोदर? अफवांवर दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली,…

दीपिका आणि शोएब हे सोशल मीडीयावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात.

dipika
(Photo-Dipika Kakar/Instagram)

अभिनत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम टेलिव्हजनवरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दीपिका आणि शोएब हे सोशल मीडीयावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. दैनंदिन आयुष्य असो किंवा एखादा खास क्षण अनेक घडामोडी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. दीपिका आणि शोएब त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे सतत चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि शोएबच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून ते आई-बाबा होणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. या बद्दल दीपिकाने एका मुलाखतीत  खुलासा केला आहे.

दीपिका गरोदर असल्याच्या चर्चांमुळे खरंतर दीपिका आणि शोएबचे चाहते प्रचंड आनंदानत आहेत. दीपिका नुकतीच एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी गेली होती. एका रिपोटेरने तिला तिच्या प्रेग्नेंसी बद्दल विचारलं होतं. हे ऐकताच अभिनेत्री आश्चर्यचकित झाली आणि तिने अतिशय दमदार उत्तर दिले. ती म्हणाला, “खरंच की काय? तुम्ही मला माझ्याचं आयुष्याबद्दल ही आनंदाची बातमी देत ​​आहेत का? मस्तचं!”. दीपिकाच्या या पद्धतीची प्रतिक्रिया बघताचं ती गरोदर नाही आहे आणि या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

याआधी देखील ती गरोदरअसल्याच्या अफवा होत्या, त्यावेळी दीपिका आणि शोएबने यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं, “मी बाबा होणार आणि दीपिका आई होणार ही बातमी खोटी आहे. या अफवा आहेत. असं काही असतं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगितलं असतं. मात्र ही बातमी खोटी काही तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका.”

‘ससुराल सिमरका’ या मालिकेच्या सेटवर दीपिका आणि शोएबमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरू लागलं. २०१८ सालामध्ये शोएब आणि दीपिका लग्न बंधनात अडकले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Television actress dipika kakar clears rumors about her pregnancy aad

ताज्या बातम्या