…म्हणून अंकिताला सुशांतचं तोंडही पाहायचं नाही

अंकिता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतेय

ankita sushant
सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे
बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सेलिब्रिटींचे ब्रेकअप झाल्याचं आपण अनेकादा पाहिलंय. ब्रेकअपनंतरही या कलाकारांनी त्याची मैत्री कायम ठेवल्याचीही उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण, सुशांत सिगं राजपूत आणि अंकिता लोखंडे मात्र याला अपवाद ठरत आहेत. अंकिता तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचा म्हणजेच सुशांतचा चेहराही पाहू इच्छित नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जरी सुशांत आणि अंकिताच्या भेटीगाठींच्या चर्चा असल्या तरीही अंकिता मात्र त्याला भेटण्याच्या मनस्थितीत नाहीये. अंकिताने आपल्या काही खास मित्रमंडळींना सुशांतला न भेटण्याचा आणि त्याच्याशी एकही शब्द न बोलण्याचा ठाम निर्णय सांगितला आहे.

ब्रेकअपनंतर अंकिता सुशांतच्या आयुष्यातून निघून गेली. त्यामुळे तिच्या आणि सुशांतच्या भेटण्याच्या चर्चा खोट्या आहेत असंच तिचं म्हणणं आहे. कामाच्या निमित्ताने सुशांतला भेटण्यास तिची काहीच हरकत नाहीये. कारण सध्यातरी अंकिता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून, बॉलिवूड पदार्पणासाठी फारच उत्सुक आहे. या साऱ्यामध्ये तिला सुशांत आणि क्रितीच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणाची पूर्ण कल्पना असून, त्या गोष्टाला ती फारसं महत्त्व देत नाही.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

https://www.instagram.com/p/BWpbQr3FPCw/

https://www.instagram.com/p/BWrrGQ0lz55/

कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तेव्हा आता खासगी आयुष्य आणि रिलेशनशिपपेक्षा अंकिता तिच्या करिअरलाच प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिता नावारुपास आली होती. याच मालिकेच्या सेटवर सुशांत सिंग राजपूतसोबत ती रिलेशनशिपमध्येही आली त्यानंतरच्या काळात हे दोघं अनेक वर्षे लिव्ह इनमध्ये होते. पण, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि प्रेक्षकांची ही लाडकी जोडी कायमची वेगळी झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Television and bollywood actress ankita lokhande doesnt want to meet ex boyfriend sushant singh rajput anymore