आपल्या विनोदी शैलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कोल्हापुरचा ढाण्या वाघ म्हणजे धनंजय पोवार ( Dhananjay Powar ) सध्या खूप चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकल्यापासून सर्वांचा लाडका डीपी दादा चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे धनंजयचा चाहता वर्ग वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना धनंजय चांगलाच पसंतीस पडला आहे.

अलीकडेच धनंजय पोवारने ( Dhananjay Powar ) सूरज चव्हाणची खास भेट घेतली. तसंच वैभव चव्हाण आणि इरिनाला देखील तो भेटला. या भेटीदरम्यान जान्हवी किल्लेकर सुद्धा होती. दिवाळीनिमित्ताने ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेल्या या सदस्यांनी खास सूरजचा गावी जाऊन भेट घेतली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. अशातच धनंजयने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये एका आईने आपल्या लेकाविषयी धनंजयला सांगितलं आहे. ७ वर्षांचा लेक धनंजयचा इतका मोठा चाहता आहे की, त्याने हातावर डीपीचं चित्र काढलं आहे.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Ankita Walawalkar and Dhananjay Powar
होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
Bigg Boss Marathi fame Ankita walawalkar fish gift to Dhananjay powar for bhaubij
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा – स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

७ वर्षांच्या या मुलाने हातावर काढलेल्या चित्राचा फोटो आणि त्याच्या आईच्या चॅटचे स्क्रीनशॉर्ट धनंजयने शेअर केला आहे. फोटोमध्ये मुलाने धनंजयचं हातावर चित्र काढून वर डीपी लिहिलं आहे. हा फोटो धनंजयला ( Dhananjay Powar ) शेअर करत त्याची आई म्हणाली की, हॅलो दादा, माझ्या ७ वर्षांच्या मुलाने असंच तुमचा फोटो पाहून स्वतःच्या हातावर पेनाने चित्र काढलं. मी विचारलं, काय केलं? तर म्हणतो, डीपी दादा. दादा सर्वांवर काय जादू केली? हे पाहून धनंजय भारावून गेला आणि त्याने आभार मानले.

हेही वाचा – ५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…

धनंजय पोवारची इन्स्टाग्राम स्टोरी
धनंजय पोवारची इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – “प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून यामधील सदस्य एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. घरात भाऊ मानणारी अंकिता होणाऱ्या नवऱ्याला घेऊन धनंजयला ( Dhananjay Powar ) भेटण्यासाठी कोल्हापुरला गेली होती. यावेळी तिने भाऊबीज केली. भाऊबीज निमित्ताने अंकिताने धनंजयला हटके गिफ्ट दिलं. ते म्हणजे तिने कोकणातले मासे डीपीला खास गिफ्ट म्हणून दिलं होतं.

Story img Loader