लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधून नावारुपाला आलेला अमरावतीचा शिव ठाकरे नेहमी त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शिवने आपल्या खेळाडू वृत्तीने, जबरदस्त डान्सने आणि महत्त्वाचं साधेपणाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. त्यामुळे तो कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला तर प्रेक्षक त्याला उदंड प्रतिसाद देतात. शिवचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सध्या शिवच्या एका जबरा फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

या जबरा फॅनने शिव ठाकरेचा टॅटू हातावर काढला आहे. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या जबरा फॅनची ही कृती पाहून शिवला आश्चर्याचा धक्का बसला.

हेही वाचा – “चौकातल्या पोराला फिल्मफेअर”, प्रवीण तरडेंची खास पोस्ट पाहून देवेंद्र गायकवाड भावुक, म्हणाले, “पदोपदी…”

या व्हिडीओवर शिव प्रतिक्रिया देत म्हणाला, “भाई यार. कृपा करून आपल्या आई-वडिलांशिवाय इतर कोणाचाही टॅटू काढू नका. आभार मानू की नको कळतं नाहीये. कृपया या चाहत्याने मला मेसेज करावा. मी जरून त्याला जरूर भेटेन. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.”

हेही वाचा – Video: “साडी नेसून कॉमेडी करायची काय गरज?” भाऊ कदम आणि ओंकार भोजनेला साडीत पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, करिअरच्या सुरुवातीला ‘रोडिज’मध्ये झळकलेला शिव ठाकरे मराठी बिग बॉसमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला. त्यानंतर शिव हिंदी ‘बिग बॉस १६’मध्ये पाहायला मिळाला. यामुळे तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. मग तो ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये झळकला. या शोच्या अंतिम फेरीपर्यंत शिव पोहोचला होता. या चार लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोनंतर शिव ‘झलक दिखला जा सीझन ११’ पाहायला मिळाला.