अभिनेत्री राधिका देशपांडे(Radhika Deshpande) ही तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. याबरोबरच सोशल मीडियावरदेखील ती सक्रिय दिसते. अनेक घटना, प्रसंग यावर ती तिची मतं मांडत असते. परखड वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते. आता तिने एका मुलाखतीत तिच्यावर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर तिने काय केले याबद्दल सांगितले आहे.

मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना

राधिका देशपांडेने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी १६ वर्षांची असताना ट्रेनमधून प्रवास करताना तिच्याबरोबर काय घटना घडली होती, याबद्दल तिने सांगितले आहे. तिने म्हटले की, “मी १६ वर्षांची होते. ट्रेनमधून मी, माझी लहान बहीण, माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान भाऊ असे तिघेच प्रवास करत होतो. मी वरच्या बर्थवर झोपले होते. ज्या राज्यातून खूप लोकं येतात त्या राज्यातील एक व्यक्ती खालच्या बर्थवर होता. तर त्या व्यक्तीने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा वाटलं की मी झोपेत आहे, दुसऱ्यांदा वाटलं की काहीतरी विचित्र होतय. तिसऱ्यांदा मी त्या व्यक्तीचा हात पकडला. खाली उतरले आरडाओरडा केला. लोकांना सांगितलं की याने काहीतरी केलंय; तर झोपा झोपा असं आम्हाला म्हटल गेलं. तिथे एक म्हातारा माणूस होता, वरती जोडपं होतं. मला रात्रभर झोप आली नाही. तो मुलगा तिथेच होता, त्याचा मित्रही होता. दोघे घाबरले होते.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

“मला ते सहनच होतं नव्हतं. हे माझ्याबरोबरच का झालं? माझ्या आई-वडिलांनी मला एकटं का सोडलं? हे असं का होतंय?, असे विचार येत होते. माझा भाऊ तेव्हा झोपला होता. मी त्याला सकाळी ६ वाजल्यानंतर उठवलं आणि त्याला सगळा प्रसंग सांगितला. तो लहानच १२-१३ वर्षांचा होता. मी त्याला सांगितलं, मी त्याला झापड मारणार आहे आणि मी मारल्यानंतर तूसुद्धा मारायचं. मग मी दिली कानाखाली त्या मुलाच्या. तर आजूबाजूचे लोक राहू द्या ताई, राहू द्या ताई असे म्हणत होते. आपल्या समाजात कसे लोक असतात पाहा , मी त्यांना सांगितलं याने अतिप्रसंग केलाय माझ्याबरोबर आणि याला आता खाली उतरवा. मग टीसीला बोलावलं. मग त्याला पुढच्या स्टेशनला उतरवण्यात आलं. त्याचा मित्रही उतरला. माझ्या मनाला शांती मिळाली”, असा प्रसंग राधिका देशपांडेने सांगितला आहे.

हेही वाचा: ‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

दरम्यान, या मुलाखतीत राधिका देशपांडेने अनेकविध गोष्टींवर मत व्यक्त केलं आहे. मंगळसूत्र ही भावनिक गोष्ट असल्याचेदेखील अभिनेत्रीने म्हटले आहे.

Story img Loader