अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. नुकतंच एका चाहत्याला सोहमने सडेतोड उत्तर दिले आहे.

सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोहमचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तर दिली.
आणखी वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर भर चित्रपटगृहात स्त्रियांनी केलं असं काही…, मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…

rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
lion attacked the leopard Video
‘शेवटी त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता’, सिंहाने केला बिबट्यावर हल्ला; पण बिबट्याने केलं असं काही… पाहा थरारक VIDEO
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”
Mallikarjun Kharge
“मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; भाजपाकडून टीका!

यावेळी एका चाहत्याने सोहमला “इतका रिकामी असतोस का?” असा प्रश्न विचारला आहे. त्यावर सोहमने फारच हटके पद्धतीने त्याला उत्तर दिले आहे. ‘निकामी असण्यापेक्षा रिकामी परवडला”, असे सोहमने यावेळी उत्तर देताना म्हटले आहे.

soham bandekar
सोहम बांदेकरची कमेंट

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला गेला होता. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.

आणखी वाचा : “बोल्ड सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?” प्रिया बापट म्हणाली, “उमेशपेक्षा…”

त्यानंतर आता तो ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकत आहे. यात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Story img Loader