scorecardresearch

‘तू माझा क्रश आहेस’ म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरचे हटके स्टाईल उत्तर, म्हणाला “हेच मला…”

तू खूप भारी आहेस आणि हँडसम पण, असेही ती चाहती यावेळी तिला म्हणाली.

‘तू माझा क्रश आहेस’ म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरचे हटके स्टाईल उत्तर, म्हणाला “हेच मला…”
सोहम बांदेकर

अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यावेळी त्याने भावूक पोस्ट शेअर केली होती. सोहमचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच त्याने एका चाहतीच्या हटके प्रश्नाला उत्तर दिले आहे.

सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावर त्याने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. यावेळी सोहमला तुझा आवडीचा रंग कोणता, तुला काय खायला आवडते, तुझे आवडते फास्ट फूड काय? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. त्याची त्याने फार हटके पद्धतीने उत्तर दिली.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या सेशनदरम्यान सोहमला एका चाहतीने प्रश्न विचारला होता. “तू खूप भारी आहेस आणि हँडसम पण. तु माझा खूप आवडता आहेस आणि माझा क्रश पण आहेस”, असे त्या चाहतीने त्याला सांगितले. त्यावर सोहमने फार हटके पद्धतीने उत्तर दिले. यावेळी सोहमने त्या चाहतीला धन्यवाद म्हटले आहे. यावर उत्तर देताना सोहम म्हणाला, “हेच मला स्वत:बद्दल वाटलं असतं तर किती बरं झालं असतं. पण खूप खूप धन्यवाद.”

आणखी वाचा : “आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:36 IST

संबंधित बातम्या