मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने निवेदिता यांना चाहते सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसंच कलाकार मंडळीदेखील खास पोस्ट करत निवेदिता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील कलाकारांनी निवेदिता यांना वाढदिवसानिमित्ताने खास सरप्राइज दिलं आहे.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका २ डिसेंबरपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू झाली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश देसाई, हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम पाहायला मिळत आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत निवेदिता यांनी शुभांगी हे पात्र साकारलं आहे. या मालिकेला चांगला टीआरपी मिळत आहे. नुकतंच मालिकेच्या सेटवर निवेदिता सराफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.

Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
jaideep ahlawat father died before paatal lok 2 release
‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा – “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील कलाकारांनी निवेदित सराफांना वाढदिवसानिमित्ताने खास सरप्राइज दिलं. वाढदिवसानिमित्ताने त्यांची मेकअप रुम फुग्यांनी सजवली. याचा व्हिडीओ पल्लवी कदमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, निवेदिता सराफ सरप्राइज पाहून भारावलेल्या दिसत आहेत.

हेही वाचा – Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स

हेही वाचा – “या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

दरम्यान, निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्या अभिनयबरोबर निर्माती म्हणूनही उत्तम काम करत आहेत. आजच त्यांचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात निवेदिता यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय २४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात त्या पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात निवेदिता सराफ यांच्यासह अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, राजसी भावे, मिताली मयेकर झळकणार आहेत.

Story img Loader