‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरून पोस्टमुळे चर्चेत असतात. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी जावयाच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेते मिलिंद गवळी यांचा जावयाचं नाव दिग्विजय कदम असं आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या हिरो, आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडूनच शिकावं. दिगूबाबाला मी अगदी त्याच्या लहानपणापासूनच ओळखतो. कुटुंबावर किती संकटं आली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणारा दिगूबाबाला मी अनेक वर्ष पाहत आलोय. पाचगणीला होस्टेलमध्ये राहून शिक्षणाची जबाबदारी असो, वडील गेल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेणं असो. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (आपल्या देशातल्या अति महत्त्वाच्या कंपनी) मध्ये १२ वर्ष प्रामाणिक नोकरी करणे असो किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला मित्रमंडळींना ज्याचा आधार वाटतो, जो आपल्या हक्काचा वाटतो, असा माझा हा दिगूबाबा. जावई कधी झालाच नाही, पहिल्या दिवसापासून माझा मुलगाच झाला, माझा हिरो.”

prasad jawade and amruta deshmukh dances on shahid kapoor song
२१ वर्षांनी पुन्हा ‘इश्क विश्क’! शाहिदच्या गाण्यावर प्रसाद जवादे अन् अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स, सर्वत्र होतंय कौतुक
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
tujhyat jeev rangala fame hardik joshi and akshaya deodhar dance on pushpa 2 song
Video : राणादा अन् पाठकबाईंना पडली ‘पुष्पा २’च्या ‘सूसेकी’ गाण्याची भुरळ! हार्दिक जोशीच्या नव्या हेअरस्टाइलने वेधलं लक्ष
Tharla tar mag fame Priyanka Tendolkar likes this actor said he is a crush
‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकरला आवडतो ‘हा’ अभिनेता, म्हणाली, “तो पळून…”
Aishwarya Narkar dance video on 25 years old Bollywood song with amruta viral on social media
Aishwarya Narkar VIDEO: २५ वर्षांपूर्वीच्या ‘या’ बॉलीवूड गाण्यावर अमृतासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर; चाहते म्हणाले, “अहो तुमचा नवरा…”
tharala tar mag new episode updates
ठरलं तर मग : प्रिया चोरणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, अर्जुन रंगेहाथ पकडणार? पाहा प्रोमो
Saleel Kulkarni start new hotel at sinhagad road khau galli
सलील कुलकर्णींनी हॉटेल व्यवसायात ठेवलं पाऊल, आईच्या हस्ते केलं उद्घाटन, पाहा फोटो
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स, चाहत्यांची जिंकली मनं

“आता अनेक वर्ष मी या सिनेमा क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी खूप खोटे खोटे हिरो बघितले आहेत. ज्यांना हिरो करण्यासाठी किंवा हिरो दाखवण्यासाठी असंख्य लोकांची, पडद्या मागच्या ४०-५० लोकांची मेहनत लागत असते, तरी पडद्यावर जेव्हा आपण त्यांना पाहतो तर ते हिरो वाटतच नाही. पण दिग्विजय भास्करराव कदम हा माझ्यासाठी खरा हिरो आहे. सिनेमातला हिरो होणं फार काही कठीण नाही असं मला वाटतं. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हिरो होणं खूप कठीण आहे, खूप मोठी गोष्ट आहे.”

“गेली सात आठ वर्ष मी दिग्विजयला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये, रिसर्च लॅबमध्ये बाहेरून एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा एखादी मुंगी सुद्धा आत जाऊ शकत नाही. त्याच्या आत मध्ये तो तासंतास काम करून, डोक्याचा भुगा झाल्यानंतर सुद्धा बाहेर पडल्यानंतर हसतमुख राहून, दुसऱ्यांना ही प्रसन्न ठेवून, धमाल मस्ती करत, स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन, Sports Cinema literature, adventure, travelling सगळ्या गोष्टींमध्ये मनापासून interest घेऊन, इतरांची मन सांभाळत, आनंदी राहतो, तोच खरा हिरो असतो. So दिग्विजय फक्त हिरो दिसत नाही तर माझ्यासाठी तो माझा खरा हिरो आहे. वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उदंड यशस्वी आरोग्यदायी आणि आनंदमय आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, मिथिला आणि दिग्विजय दोघेही खूप खूप सुखी राहा,” असं मिलिंद गवळी यांनी जावयाविषयी भरभरून लिहिलं आहे.

हेही वाचा – हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ला २० वर्षे पूर्ण; करिअरच्या शोधात भटकलेल्या तरुणाची कथा पुन्हा पाहता येणार मोठ्या पडद्यावर, कधीपासून जाणून घ्या…

मिलिंद गवळींच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिलिंद गवळींनी जावयाबरोबर बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत जावयाच्या एनर्जीचं, उत्साहाचं कौतुक केलं होतं. त्यांच्या या देखील पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.