काही दिवसांपूर्वी मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मराठी नववर्षाच्या निमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी हे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. या मालिकेमध्ये ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचेही पाहायला मिळते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट
मिलिंद गवळींची पोस्ट
“नववर्षाची सुरुवात
नवी आशा नवे स्वप्न,
आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे आपल्याला कोणालाच काहीच माहिती, वर्तमान आपल्या हातात आहे,
वर्तमानात कसं जगायचं असतं ते आपल्यालाच ठरवावे लागतात,
रडत कुडत काळजी करत जगा की छान स्वच्छंद आणि आनंद जगायचं हे आपल्या च हातात आसते.
आपण रडलो तर आपण एकटेच रडत असतो.
पण आपण हसत राहीलो तर आपल्याबरोबर सगळे हसतात.
त्यामुळे हसत आनंदी जगा… छान जगा…” अशी पोस्ट मिलिंद गवळींनी केले आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.