Aai Kuthe Kay Karte Serial : तब्बल पाच वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने छोट्या पडद्याचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग तयार झालेला आहे. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, अभिषेक, यश, अनघा ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटली. आता मालिका संपल्यावर यामधल्या दोन कलाकारांचं रियुनियन झालेलं आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीने ठाण्यात स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. अभिनेत्याच्या हॉटेलला यापूर्वी बऱ्याच कलाकारांनी भेटी दिल्या आहेत. मात्र, नुकतीच या मालिकेतील त्याची सहकलाकार राधा सागरने हॉटेलला भेट दिल्याचे फोटो निरंजनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : “फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

अभिनेत्री राधा सागरने मालिकेत अंकिता हे पात्र साकारलं होतं. अभिषेक आणि अनघाच्या लग्नात अंकिताने आत्महत्या करण्याचा खोटा प्रयत्न केलेला असतो. यामुळे अभी-अनघाचं लग्न मोडतं आणि त्यानंतर अभिषेक अंकिताशी अचानक लग्न करून घरी येतो. पुढे, जाऊन देशमुख कुटुंबीयांसमोर अंकिताचं कारस्थान उघड होतं आणि तिची घरातून हाकलपट्टी केली जाते. अंकिता या पात्राची नंतर मालिकेतून एक्झिट झाली होती. त्यामुळे निरंजनने राधाबरोबरचा फोटो शेअर करत यावर, “अभी-अंकिता कोणा कोणाला आठवत आहेत?” असं कॅप्शन दिलं आहे.

निरंजन लिहितो, “आज राधा सागर म्हणजेच ‘आई कुठे काय करते मालिकेतील अंकिता. हिने बडीज सँडविच कॅफेला येऊन येथील पदार्थांचा आस्वाद घेतला. पदार्थंचं कौतुक करत माझ्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली. इथला हिबिस्कस टी राधाला विशेष आवडला. खूप खूप आभार राधा लवकरच एकत्र काम करू”

हेही वाचा : “जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

नेटकऱ्यांनी या ऑनस्क्रीन जोडीला एकत्र पाहून अभिनेत्याच्या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “हो आठवतंय, तुम्ही दोघं मालिकेत लॉकडाऊन सुरू असताना लग्न करून आला होता…. मग तिला कसं घालवलं”, “आठवतंय ना…तू अनघाला सोडून गेलास आणि हिने आत्महत्येचं नाटक केलं होतं”, “हिने खोट्या झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या” अशा प्रतिक्रिया देऊन युजर्सनी अजूनही तुमची जोडी लक्षात असल्याचं अभिनेत्याला सांगितलं आहे.

Story img Loader