International Yoga Day 2025 : जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात योगाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आज योग दिनानिमित्त अनेक कलाकार मंडळीही सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांचे योगा करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करीत आहेत. ‘आई कुठे काय करते’फेम एका अभिनेत्यानेही योग दिनानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून निरंजन कुलकर्णी हा अभिनेता घराघरात पोहोचला. त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या बायकोबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याची बायको मनीषा त्याला योग शिकविताना दिसत आहे. अभिनेत्याने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमधून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यूट्रिशनिस्ट व योगा एक्स्पर्ट बायकोसह योग शिकत असल्याचे त्याने सांगितले आहे
निरंजनची बायको मनीषा गुरम न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाईल एक्स्पर्ट म्हणून काम करते, असे तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केले आहे. नुकतेच १ जून २०२५ रोजी निरंजन व मनीषा यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळाले.
निरंजन शेवटचं ‘आई कुठे काय करते’ या प्रसिद्ध मालिकेत झळकला होता. त्यामध्ये तो अभिषेक देशमुख या भूमिकेत झळकला होता. यापूर्वी त्याने मराठीतील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु, ‘आई कुठे काय करते’मधून तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. त्यामुळे आता निरंजन पुढे कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.