scorecardresearch

“त्यांनी ठरवूनच…” ‘आई कुठे काय करते’मधून ब्रेक घेण्याचे गौरीने दिले स्पष्टीकरण

गौरी कुलकर्णी ही सध्या ‘सन मराठी’वर ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत दिसत आहे.

gauri kulkarni
गौरी कुलकर्णी

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्याचं दिसतं. या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी. सध्या गौरी ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच गौरीने ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोडण्याबद्दल किंवा त्यातून ब्रेक घेण्याबद्दल भाष्य केले आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत गौरी कुलकर्णी ही यात सहाय्यक पात्र साकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गौरीने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता नुकतंच तिने एका मुलाखतीत ती ही मालिका सोडणार की नाही याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “महिलांनी पुरुषांना सल्ले दिले की…” प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली

“मी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोडणार की नाही, हे खरं सांगायचं तर सिक्रेट आहे. मी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोडलेली नाही. त्यावेळी त्या कथानकाची ती गरज होती. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या कथानक, लिखाण या सर्वच गोष्टीमुळे फार पुढे गेलेली आहे.

त्यामुळे त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणत्या पात्राची गरज आहे, ते आणायला हवं, याची अगदी योग्य ती कल्पना आहे. आता या क्षणी माझ्या पात्राची गरज नाही, असे ठरवूनच त्यांनी हे केले आहे. अनेक गोष्टी आहेत. मी त्या मालिकेत दिसणार की नाही, हे आता तुम्हाला कळेलच”, असे तिने यावेळी सांगितले.

दरम्यान गौरी कुलकर्णी ही सध्या ‘सन मराठी’वर ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत दिसत आहे. यात ती शर्वरी हे पात्र साकारत आहे. तर दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आईच्या दुसऱ्या लग्नासाठीही ती परत मालिकेत आल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 18:23 IST
ताज्या बातम्या