Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते. अरुधंती, यश, अभिषेक, अनघा, अप्पा, अनिरुद्ध, आरोही या सगळ्या पात्रांचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. यापैकी आरोहीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कौमुदी वलोकरने मालिका संपल्यावर खऱ्या आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कौमुदी वलोकरचा ( Kaumudi Walokar ) साखरपुडा पडला होता. आता लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनी नुकतंच कौमुदीचं केळवण केलं. यावेळी यशची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख तसेच त्याची पत्नी कृतिका देव. अनिशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमंत ठाकरे आणि अश्विनी महांगडे उपस्थित होती.

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

कौमुदी वलोकरचं केळवण

कौमुदीच्या ( Kaumudi Walokar ) केळवणासाठी खास फुलांची आणि केळीच्या पानांची सजावट करण्यात आली होती. यावर मोठ्या अक्षरात ‘कौमुदीचे केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं. अभिनेत्रीने या तिघांचे आभार मानत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.

कौमुदी म्हणते, “केळवण… मालिकेत काम करताना ही सुंदर माणसं माझ्या आयुष्यात आली. हे सगळे माझे सहकलाकार आहेत पण, खऱ्या आयुष्यात हे मला कायम योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. अभिषेक आणि कृतिका तुम्ही नेहमीच मला खंबीरपणे साथ दिलीत. तुम्ही दोघं मला अगदी कुटुंबासारखे आहात. सुमंत, वर्ष झालं आपली भेट झालीये…आणि ही आपल्या मैत्रीची सुरुवात आहे. अश्विनी…तू आता माझी फक्त मैत्रीण राहिली नाहीयेस. तू माझ्यासाठी सर्वात जवळची आणि खास व्यक्ती झालीयेस. माझ्या डोळ्यातले अश्रू तुझ्याबद्दल काय सांगायचंय हे व्यक्त करतात, कारण शब्द पुरेसे नाहीयेत. माझ्या आयुष्यात तू खूप महत्त्वाची आहेत. संपले शब्द! हे फक्त केळवण नाहीये. योग्य लोकांबरोबर आयुष्य जगल्यावर, हे आयुष्य किती सुंदर असू शकतं याची जाणीव आहे. माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय. तुम्हा तिघांचे खूप खूप आभार!”

हेही वाचा : दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल

कौमुदीच्या ( Kaumudi Walokar ) या पोस्टवर अश्विनी महांगडे कमेंट करत लिहिते, “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एवढंच लक्षात ठेव… बाकी मी आहे कायम” याशिवाय चाहत्यांनी सुद्धा कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत कौमुदीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. आता अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader