scorecardresearch

‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीचा नवीन लूक चर्चेत, अभिनेत्रीचा नवा हेअर कट पाहून सुकन्या मोनेंची खास कमेंट…

‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीचा नवीन लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या नव्या हेअर कटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले…

arundhati aka madhurani prabhulkar shares her new hair cut photo
अरुंधतीचा नवीन लूक पाहिलात का?

‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अजूनही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अरुंधतीचं घर, संसार, जिद्द याभोवती मालिकेचं कथानक फिरतं. अरुंधती या मुख्य पात्राची दमदार भूमिका मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे.

मधुराणीला प्रभुलकरला आता घराघरांत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण तिच्या पात्राशी कनेक्ट करू लागला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत अभिनेत्रीचा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

tharala tar mag fame actress jui gadkari
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो
tu chal pudha fame actress dhanashree kadgaonkar
“प्रसूतीनंतर काम कसं सांभाळलंस?”, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्रीने एका शब्दात दिलं उत्तर…
marathi actress Megha Dhade
“…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा
Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

हेही वाचा : “दोन्ही संघात एकच फरक होता…”, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल प्रसिद्ध मराठी अभिनेते म्हणाले…

मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये नवीन हेअर कटमधील तिचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या फोटोला “न्यू हेअर कट स्माईल तो बनता है” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या नव्या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “वाईट प्रतिक्रिया, बालिश मीम्स अन्…”, भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट, म्हणाला, “शेवटी हा एक…”

मधुराणीची जवळची मैत्रीण आणि मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने यांनी लाडक्या मैत्रिणीच्या फोटोवर खास कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “खूप गोड दिसते आहेस…” असं सुकन्या मोनेंनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी मधुराणीच्या फोटोवर “सुंदर! आई कुठे काय करते मध्ये पण हाच look दाखवला पाहिजे…”, “गोड… खूपच सुंदर”, “छान दिसतेस मधुराणी” अशा कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame arundhati aka madhurani prabhulkar shares her new hair cut photo on instagram sva 00

First published on: 20-11-2023 at 10:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×