'आई कुठे काय करते' या मालिकेला २०१९ पासून प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. या मालिकेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री गौरी कुलकर्णीला या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्रीने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या गौरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. हेही वाचा : ‘जब वी मेट’ चित्रपटात चष्मा लावण्यासाठी शाहिद कपूरने केलेलं भांडण; म्हणाला, “आधी निर्मात्यांना…” गौरी कुलकर्णीने २३ सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. "Its Happening" असं कॅप्शन देत गौरीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंना दिलेलं कॅप्शन आणि तिच्या बोटातील नवीकोरी हिऱ्याची अंगठी पाहून गौरीने गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा : Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…” गौरी कुलकर्णीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. "तुला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा", "गौरी कोण आहे तो? साखरपुड्याचे फोटो शेअर कर", "गौरीचं लग्न होणार…" अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोची चर्चा हेही वाचा : Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर दरम्यान, "मी नुकत्याच शेअर केलेल्या आनंदाच्या बातमीवर कौतुकाचा वर्षाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार…माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेबद्दल लवकरच मी तुम्हाला सांगेन…मला थोडा वेळ द्या." अशी इन्स्टाग्राम स्टोरी गौरी कुलकर्णीने शेअर केली आहे. त्यामुळे गौरीचा खरंच साखरपुडा झाला आहे का? तिचा जोडीदार नेमका कोण आहे? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.