मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक ‘आई कुठे काय करते’ मालिका आहे. लवकरच ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका महिलांसाठी आयडॉल ठरली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच ती महाराष्ट्राची लाडकी आई ठरली.

तसंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील इतर भूमिका देखील घराघरात पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशिष या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. सर्वाधिक टीआरपी ‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळत होता.

Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar This scene was challenging
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा – “सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”

पण गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. अशातच काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून मालिका बंद होणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मालिका बंद होणार असल्यामुळे मधुराणी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा – Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “खूपच मोठा प्रवास होता. सुरू होताना खरंच वाटलं नव्हतं आपण पाच वर्ष एवढं लोकांचं प्रेम मिळवणाऱ्या एका प्रोजेक्टचा भाग होतो आहोत. आता म्हणतोय पाच वर्ष. पण, ही पाच वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. महिन्यातील २०, २२ दिवस आम्ही शूट करतोय. सेटवरच आहोत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सीन केलेत. इतका अरुंधतीचा ग्राफ केलाय. इतके वेगवेगळे पदर त्या भूमिकेचे केलेत. थोडंस भावुक व्हायला होतं.”

पुढे चाहत्यांविषयी मधुराणी प्रभुलकर म्हणाली की, आजही चाहते येऊन भेटतात. डोळ्यात पाणी असतं. स्वतःला अरुंधतीच्या डोळ्यात बघतात. मला प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका टेलिव्हिजनच्या माध्यमातून करायला मिळाली, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.

Story img Loader