स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टॉप ५ मालिकांपैकी एक आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर कायमच चर्चेत असते. सध्या ती तिच्या लेकीबरोबर ऑस्ट्रेलियाला फिरण्यासाठी गेली आहे. तिथे तिने तिच्या भावासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
अरुंधती ही मालिकेतून ब्रेक घेऊन ती तिच्या लेकीसह ऑस्ट्रेलियाला गेली होती. मधुराणी ही मालिकेच्या शूटिंगमुळे आठवड्यातले चार ते पाच दिवस मुंबईत असते. तर दोन-तीन दिवस पुण्याला त्यांच्या घरी असते. तिची मुलगी पुण्यात राहत असल्याने मधुराणीला तिच्या मुलीला फारसा वेळ देता येत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपच्या निमित्ताने त्या दोघींनी एकमेकींबरोबर खूप मजा-मस्ती केली. तिने याचे अनेक फोटो-व्हिडीओही पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : Video : “मी शेंगा खाल्ल्या नाहीत…” समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांवर क्रांती रेडकरची प्रतिक्रिया, म्हणाली “आपली न्याय व्यवस्था…”




नुकतंच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या सिडनी टूरबद्दल सांगितले आहे. तसेच तिने तिच्या भावासाठी आणि त्याच्या बायकोसाठी पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणी प्रभूलकरची पोस्ट
“आमच्या ऑस्ट्रेलिया ट्रिपला चार चाँद लावले ते मंदार अनघा आणि आस्तिक च्या सहवासाने. मंदार माझा तसा लांबचा भाऊ … त्याला लहानपणापासूनच ओळखते. आणि अनघाचं आणि त्याचं तसं लहानपणीच जमलं त्यामुळे तिलाही अनेक वर्षं.
दोघेही प्रचंड हुशार आहेत. मंदार CA तर अनघा भारी लेव्हलची डोळ्यांची डॉक्टर. दोघेही अनेक वर्षं सिडनीमध्ये राहतायत … तिथेही अतिशय मेहनत आणि एकमेकांना पूर्ण साथ देऊन यांनी स्वतः चं स्थान निर्माण केलंय.सिडनीत जाऊन त्यांच्याकडे जायचं नाही हे शक्यच नव्हतं.. ३ दिवस त्यांच्याबरोबर आणि अस्तिकबरोबर होतो …भारी मजा केली… खूप फिरलो आणि खूप खाल्लं… दोघेही उत्साह आणि हास्याचा झरा आहेत. त्यांच्याबरोबरचे दिवस फार मजेत आणि अखंड हसण्यात गेले.
दोघेही एकमेकांना अनेक वर्षे ओळखतात, अगदी कॉलेज पासून .. लग्नाला तर खूपच वर्षं झाली .. पण त्यांच्यातलं मैत्र अजूनही टिकून आहे. कुठेही ते टिपिकल ‘नवराबायको’ झाले नाहीयेत… आजही अगदी buddies सारखं नातं आहे त्यांच्यात… एकमेकांची खेचतात… टवाळक्या करतात..भांडतात… एकमेकांना तोंडावर काहीही बोलतात.. आम्ही हसून हसून फुटलो… स्वरालीला तर त्यांच्या जोडीच्या प्रेमात पडली … त्यांची ही मैत्री अशीच आजन्म टिकून राहू दे”, अशी पोस्ट तिने केली आहे.
आणखी वाचा : “भिडे गुरुजींसारखी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्म…” शरद पोंक्षेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर
दरम्यान मधुराणी ही नुकतीच भारतात परतली आहे. ती लवकरच शूटींगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.