‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर ही तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेऊन ती तिच्या लेकीसह ऑस्ट्रेलियाला गेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे मालिकेच्या शूटिंगमुळे मधुराणी आठवड्यातले चार ते पाच दिवस मुंबईत असते आणि दोन-तीन दिवस पुण्याला त्यांच्या घरी असते. तिची मुलगी पुण्यात राहत असल्याने मधुराणीला तिच्या मुलीला फारसा वेळ देता येत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपच्या निमित्ताने त्या दोघींनी एकमेकींबरोबर खूप मौजमस्ती केली. तर आता या ट्रिपवरून परत आलेल्या मधुराणीने एक खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिने या ट्रिपदरम्यानचे काही फोटो शेअर करत लिहिलं, “गेली तीन वर्षं माझं एक विशिष्ट रुटीन झालंय. सात-आठ दिवस मुंबईत शूट करायचं आणि दोन-तीन दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये…. long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो… गेल्या तीन वर्षांत सलग असे आठ-दहा दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही, ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं आणि खूप सारा ताण असतो. माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिपची ही संधी चालून आली.”

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते!’ मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का? शूटिंगमधून ब्रेक घेत माधुरणी लेकीबरोबर घालवतेय क्वालिटी टाईम

पुढे तिने लिहिलं, “ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमनाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला, ‘मी तुझ्या ‘कवितेचं पान’ चा मोठा फॅन आहे…इथे काही कवी आहेत…तुझा एपिसोड इथे करता येईल का ? मी म्हटलं, मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते. त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं… ‘आई… ‘च्या टीमने पण प्रचंड सहकार्य करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरालीची ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे… उमेश-गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव. आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरं तर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.”

हेही वाचा : “आजच्या काळात पार्टी न करता…” मधुराणी प्रभूलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अखेरीस तिने लिहिलं, “सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचं आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणं इतकं सोपं नाही हो…त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असंच म्हणायला हवं…सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वरालीला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादासुद्धा…!!”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar shared a post about australia trip rnv
First published on: 28-05-2023 at 16:18 IST