मागील पाच वर्षांपासून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती घराघरात पोहोचली. अनेक महिलांसाठी ती प्रेरणा झाली. अशा या लोकप्रिय अरुंधतीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’चा ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसंच या मालिकेत हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला खुलासा; म्हणाली, “पुढचा प्रोजेक्ट…”

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकताच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली? याविषयी सांगितलं. तसंच लवकरच नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार असल्याचा खुलासा केला. याशिवाय तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी देखील भाष्य केलं.

इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये मधुराणी प्रभुलकरला विचारलं की, ‘आई कुठे काय करते’च्या दुसऱ्या पर्वाचा प्लॅन करा. यावर मधुराणी म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं अकाउंट आहे. त्यांना हे नक्की पाठवा. त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरं पर्व करायला आवडेल.”

हेही वाचा – ५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट

हेही वाचा – “हे थोडं अस्वस्थ करणारं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “मधुराणीने साकारलेली आई…”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीप्रमाणे इतर भूमिका देखील घराघरात पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशिष या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.

Story img Loader