Milind Gawali New Home : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळचं वाटतं. यामध्ये आई अरुंधतीची प्रमुख भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे तर, यामध्ये वडिलांची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली आहे. नकारात्मक भूमिका असूनही अनिरुद्ध या पात्राचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेते सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतात. मिलिंद यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी नवीन घरं घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील मिलिंद यांच्या सहकलाकार रुपाली भोसले व अश्विनी महांगडे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. आता यामध्ये आणखी एक नाव जोडलं आहे. मिलिंद ( Milind Gawali ) यांनी देखील नवं घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. आपल्या बायकोच्या जोडीने त्यांनी या नव्या घरात प्रवेश केला.

Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
IC814 News What pooja kataria Said?
IC-814 : “आम्हाला ‘डॉक्टर’ने सांगितलं धर्म बदला, तुमचं सरकार…” IC-814 मध्ये असलेल्या महिलेने काय सांगितलं?
man attempt suicide by shooting himself due to a love affair
प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
Sourav ganguly trolled insensitive comment
Sourav Ganguly : ‘अशा घटना जगभर घडतात…’, कोलकाता प्रकरणावरील वक्तव्य सौरव गांगुलीला भोवलं, जारी केलं निवेदन
Surykumar Yadav react on insta story about Kolkata Doctor Rape and Murder Case
Surykumar Yadav : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सूर्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मुलींच्या रक्षणाची नव्हे तर मुलांना सज्ञान करण्याची गरज…’
BCCI Secretary Jay Shah statement on Mayank Yadav
Mayank Yadav : ‘तो टीम इंडियात असेल…’, बीसीसीआयचे सचिव जय शाहांचे मयंक यादवबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, आम्ही त्याच्यावर…

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवी पौराणिक मालिका! पार पडला मुहूर्त सोहळा; महेश कोठारे म्हणाले, “याद्वारे महाराष्ट्रातील…”

मिलिंद गवळी यांचं नवीन घर

मिलिंद गवळी ( Milind Gawali ) यांनी ठाण्यात नवीन घर घेतलं आहे. त्यांचं संपूर्ण घर आधुनिक टच देऊन सजवण्यात आलं आहे. मिलिंद यांच्या दारावरील नेमप्लेटवर ‘मिलिंद – दीपा’ असं नाव लिहिण्यात आलं आहे. याची झलक ‘मिलिंद गवळी व लोकमत फिल्मी’ने एकत्रितरित्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पारंपरिक पद्धतीने बायकोच्या साथीने पूजा करून मिलिंद यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्यावर सध्या या नव्या घरासाठी संपूर्ण टेलिव्हिजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Happy Birthday बायको! रितेशने जिनिलीयाला दिल्या हटके शुभेच्छा, रोमँटिक नव्हे तर शेअर केला मजेशीर व्हिडीओ

milind gawali
मिलिंद गवळी यांनी घेतलं नवीन घर ( Milind Gawali )

काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजे रुपाली भोसलेने हक्काचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली होती. आता पाठोपाठ मिलिंद गवळींनी आपल्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा अनिरुद्धच्या या नव्या घराचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: “आज स्वतःसाठी उभा राहा…”, विशाखा सुभेदारची ‘बिग बॉस मराठी’मधील ‘या’ सदस्यासाठी पोस्ट, म्हणाली, “दाखवून दे…”

दरम्यान, मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ या स्पर्धेत कोण बाजी मारणार याचा सीक्वेन्स चालू आहे. अनेक अडथळे पार करत अखेर अरुंधती ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ ही स्पर्धा जिंकणार आहे. ही मालिका दररोज दुपारी २.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाते.