Premium

Video : नारळ-सुपारीच्या बागा, प्राचीन विहीर अन्…; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता पोहोचला कोकणात, पाहा व्हिडीओ…

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने शेअर केला कोकणातील सुंदर व्हिडीओ…

aai kuthe kay karte fame niranjan kulkarni kokan video
अभिनेत्याने शेअर केला कोकणातील सुंदर व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांचं मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे लागोपाठ सुट्ट्या आल्या किंवा धावपळीच्या शूटिंगमधून थोडावेळ ब्रेक घेत हे कलाकार कोकणात पोहोचतात. कोकणातील संस्कृती, हिरवागार निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या नद्या याबद्दल प्रत्येकालाच आकर्षण असतं. सध्या मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला असाच एक अभिनेता कोकणात पोहोचला आहे. अभिनेत्याने शेअर केलेला कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “आम्हीच नंबर १”, TRP च्या चुकीच्या बातम्यांबद्दल जुई गडकरीने मांडलं मत; म्हणाली, “आम्हाला चॅनेलकडून…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता निरंजन कुलकर्णीने त्याच्या इन्स्टाग्रामवर कोकणातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता कोकणातील प्राचीन विहिरीतून पारंपरिक पद्धतीने पाणी काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “स्वच्छ पाणी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर अन्…”, आदेश बांदेकर पर्यावरणपूरक पद्धतीने करतात बाप्पाचे विसर्जन, म्हणाले “ती माती…”

निरंजन कुलकर्णीने हा व्हिडीओ शेअर करत याला “विहिरीच्या पाण्याची चव निराळी” असं कॅप्शन दिलं आहे. कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून विहिरीतून पारंपरिक पद्धतीने पाणी उपसून ते पाटाच्या माध्यमातून शेती-बागांमध्ये सोडलं जातं. अभिनेत्याच्या व्हिडीओमध्या नारळ-सुपारीच्या बागांची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, अभिनेत्याची होणार चौकशी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नेटकऱ्यांनी निरंजनने शेअर केलेल्या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. तसेच कोकणातील संस्कृतीचं दर्शन घडवल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं आहे. दरम्यान, सध्या निरंजन कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुधंतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच अभिषेकची भूमिका साकारत आहे. गेल्यावर्षी ‘सोल कढी’ या लघुपटाच्या माध्यमातून निरंजनने नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame niranjan kulkarni shared beautiful video of konkan culture and enjoying holiday sva 00

First published on: 04-10-2023 at 19:10 IST
Next Story
“आम्हीच नंबर १”, TRP च्या चुकीच्या बातम्यांबद्दल जुई गडकरीने मांडलं मत; म्हणाली, “आम्हाला चॅनेलकडून…”