scorecardresearch

“जीव ओतून काम करतो आणि…” पुरस्कार हाती येताच ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत

मधुराणी प्रभुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव, पोस्टद्वारे काय म्हणाली अभिनेत्री?

madhurani prabhulkar aai kuthe kay karte
मधुराणी प्रभुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव, पोस्टद्वारे काय म्हणाली अभिनेत्री?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली. या मालिकेमध्ये गृहिणी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. म्हणूनच आतापर्यंत या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरचा तर खूप मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच थाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये काही कलाकारांना मानाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांच्या कामाचं कौतुक झालं. या पुरस्कार सोहळ्याचं हे तिसरं वर्ष आहे. सलग तिसऱ्या वर्षी मधुराणीचा या सोहळ्यामध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…

याबाबत मधुराणीने एक पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्राची लाडकी व्यक्तीरेखा म्हणून मधुराणीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याबाबतच मधुराणी म्हणाली, “स्टार प्रवाह पुरस्कार… सलग तीन वर्ष… पहिलं वर्ष : सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, दुसरं वर्ष : सर्वोत्कृष्ट आई, तिसरं वर्ष : महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा. स्टार प्रवाहचे मनापासून आभार. इतकी सुंदर भूमिका मला देऊ केली. त्यामुळे मी घराघरात पोहचले. अगणित रसिकांचं प्रेम संपादन करू शकले”.

आणखी वाचा – लिव्हइन रिलेशनशिप, विधी न करताच लग्न, एकत्र दारूही प्यायले अन्…; नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांच्या लग्नाची अजब गोष्ट

“निर्माते राजन शाही सर यांचेही शतशः आभार. तसंच आमची प्रोजेक्ट हेड आणि कथा पटकथा लेखिका नमिता वर्तक आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर, संवाद लेखिका मुग्धा गोडबोले या तिघांनी ही भूमिका घडवली आहे त्यांचेही आभार. संपूर्ण टीमचे आभार. मालिकेमधील सगळ्या उत्कृष्ट कलाकारांचे आभार. या मालिकेमधील प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करतो. म्हणून ही मालिका इतकी लोकप्रिय आहे. या शंका नाही”. या पोस्टनंतर मधुराणीवर आनंदाचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या