scorecardresearch

“अंतरा, मला एक वळण दिसतंय…” मराठमोळ्या अभिनेत्रीची लेकीसाठी खास पोस्ट

“तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.”

radhika deshpande
राधिका देशपांडे

स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. याच वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरुंधती, आजी, आप्पा, संजना, अनिरुद्ध या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. याच मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. या मालिकेतील देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. नुकतंच तिने तिच्या लेकीच्या शाळेबद्दल एक पोस्ट केली आहे.

राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या लेकीचा एक वेणीफणी करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना ती भावूक झाली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

राधिका देशपांडेची पोस्ट

“प्रिय बबुष्का,
आज तुझा शाळेतला शेवटचा दिवस. आणि मला रडायला येतं आहे. रोजच्या दिनचर्येतलं एक काम म्हणजे वळणदार छानशी वेणी घाळणे.
“आईईई वेणी घालून दे”
“अंतरा फणी जागेवर ठेवत जा गं”
“आई चल पटकन किती वेळ लावते आहेस”
थांब ग जरा, हलू नकोस, वेणी नीट येत नाही मग”

तीन पदरी वेणीत वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले आहे मी आजवर. शेवटची पेड गुंफते आहे. त्याला रबर बैंड लावते आहे. स्वच्छ फणी, घट्ट वेणी, वर्षानुवर्ष वेळेत घातलेली, कधी आवडती, कधी नावडती वेणी…हे सगळं आज थांबणार.
एक वळण मला दिसतंय अंतरा. उद्यापासून शाळा नाही. आपला संवाद नाही. वेणी नाही का फणी नाही. तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण वळण आलं आहे. गाडी सुटल्या सारखं वाटतंय, डबा हरवल्यासारखा वाटतो आहे… पण…पण मी रडले नाही. चेहऱ्याकडे बघ माझ्या दिसते आहे मी रडल्यासारखी? आईनं मुलगी शाळेत जाताना चेहरा हसराच ठेवायचा असतो. नियमच आहे तसा.”

हे सगळं मी तुला बोलून दाखवलं नाही. पण तुला ते कळलं असणार. केसांवरून फिरवलेल्या फणीनं ते सांगितलं असणार. बाकी आजची वेणी वळणदार होती ह्यात शंकाच नाही.
अंतरा तू शाळेत वेळेत पोहोचली! मुलगी शिकली. मुलगी मोठी झाली. आई मात्र लहानच राहिली… असो.

तुझी… तुझीच,
आई, अशी पोस्ट राधिका देशपांडेने केली आहे.

आणखी वाचा : “माझं ठाम मत आहे की चकल्या…” ‘आई कुठे काय करते’मधील देविकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

राधिका देशपांडेच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी लाईक केले आहे. त्याबरोबर तिच्या या पोस्टखाली अभिनेते शरद पोंक्षे यांनीही कमेंट केली आहे. खुपच सुरेख लिहीलयस राधा…अशी कमेंट शरद पोंक्षे यांनी केली आहे. त्यावर तिने एक स्माईल इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 09:09 IST

संबंधित बातम्या