Premium

“तुम्ही फक्त निमित्त मात्र असता…”, मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

milind gawali
मिलिंद गवळी

लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज झाला आहे. आरती घराघरातली ही ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३’ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे. यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच कलाकार तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच त्यांनी ब्रम्हकमळ आणि गणपती महोत्सवाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

मिलिंद गवळी पोस्ट

“अहम ब्रह्मास्मी “
आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला सहज जाणवतात, समजतात , कळतातही, पण बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या अकलनाच्या पलीकडच्या असतात , आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात, मग आपण त्याला योगायोग म्हणतो, कधी कधी चमत्कारही म्हणतो,

काही आठवड्यापूर्वी, माझ्या विजू मावशीच्या घरी, म्हणजे नाशिकला पुरकर काकांकडे, 58 ते 60 ब्रह्मकमळ एकावेळी एकत्र उमलले, त्याचा व्हिडिओ मावशीने पाठवला, एकवेळेला ऊमललेले इतकी ब्रम्हकमळा ची फुलं , हे फारच सुंदर दृश्य होतं ते . ते दृश्य डोळ्यासमोर होतं , दोन-चार दिवसांनी, मी पण एक ब्रम्हकमळाचं रोप घरी घेऊन आलो, कधीतरी आपल्याकडेही ब्रह्मकमळ येतील अशा आशेने ते मी आणलं, संध्याकाळी बसून ते एका कुंडीमध्ये लावलं,

दुसऱ्या दिवशी सकाळी स्टार प्रवाह मधुन निरोप आला, यावर्षी गणपती महोत्सवामध्ये माझा परफॉर्मन्स आहे असं त्यांनी मला सांगितलं, मी चौकशी केल्यानंतर मला कळलं की दत्तगुरूंच्या आरती वर एक ॲक्ट आहे. आणि त्यामध्ये मला ब्रम्हाची भूमिका करायची आहे. मी एका झटक्यात तयार झालो. आणि डोक्यामध्ये विचार आला, काल कुंडीमध्ये लावलेल्या ब्रह्मकमळाचं रोप आणि या ब्रह्म भूमिकेचा काही संबंध असेल का ? असेलं ही ! असू शकतं ! म्हटलं ना बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये अशा घडतात ज्या आपल्या अकलनाच्या पलीकडच्या असतात.

there is a divine force which is constantly working for You. गोष्टी घडत असतात, तुमच्या हातात काहीही नसतं तुम्ही फक्त निमित्त मात्र असता . अचानक ध्यानीमनी नसताना ब्रह्माची भूमिका करून झाली आहे आणि आता कुंडीमध्ये लावलेल्या ब्रह्मकमळाच्या झाडाला ब्रह्मकमळ कधी येतील याची वाट पाहतोय. So life is unpredictable and life is also full of surprises”, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.

आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte serial fame milind gawali share instagram post ganpati festival star pravah celebrity dance nrp

First published on: 15-09-2023 at 21:08 IST
Next Story
“आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”