Aai Kuthe Kay Karte : मराठी मालिका विश्वात घराघरांत पाहिली जाणारी आणि प्रत्येक आईसाठी खास असलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मालिका लवकरच संपणार असल्याने सर्वच कलाकार या मालिकेत घालवलेले काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखलेने साकारली आहे. तिने आपल्या अभिनयाने या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. मालिकेत अरुंधतीचे दोन विवाह झाल्याचे दाखवले आहे. त्यामुळे आता अरुंधतीचं पूर्ण नाव काय? असा प्रश्न विचारल्यास अनेक जण याची वेगवेगळी उत्तरे देतील.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नील साळेकर आणि त्याची बायको श्रेया दोघेही नुकतेच ‘आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर पोहचले होते. यावेळी यशने या दोघांना अरुंधतीविषयी काही प्रश्न विचारले. त्यात अरुंधतीचं पूर्ण नाव काय? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर श्रेया आणि नील दोघांनीही मजेशीर उत्तर दिलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीने प्रश्न उत्तरांचा हा मजेशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : “देशभरातील दारूची दुकानं बंद करा, मी दारूवरील गाणी गाणार नाही”; दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर भूमिका

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नील आणि श्रेया या दोघांनाही यश, अरुंधतीचं पूर्ण नाव काय, असा प्रश्न विचारतो. त्यावेळी नील सुरुवातीला उत्तर देताना म्हणतो की, अरुंधती अनिरुद्ध देशमुख; मात्र त्याचं हे उत्तर चुकलेलं असतं. त्यानंतर श्रेया या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणते की, नेमकं केव्हाचं नाव सांगायचं? मालिकेत अरुंधतीची दोन लग्नं झाली आहेत. त्यामुळे तिला दोन नावं आहेत, श्रेया पटकन असे म्हणते आणि तिथे सर्व जण हसू लागतात. या प्रश्नाचे उत्तर देताना श्रेया पुढे म्हणते की, अरुंधतीचं पूर्ण नाव अरुंधती आशुतोष केळकर आणि तिचे हे उत्तर बरोबर ठरते.

पुढे यश या दोघांना अरुंधतीच्या गाण्याविषयी प्रश्न विचारतो आणि म्हणतो की, अरुंधतीच्या गायनाच्या क्लासचं नाव काय? गायनाच्या क्लासचे नाव सांगताना नील आणि श्रेया दोघांनाही उत्तर आठवत नाही. त्यावर अरुंधती स्वत: याचं उत्तर देत, अरुंधती असं नाव सांगते. पुढे यश, “अरुंधतीनं स्वयंपाकाची कोणती स्पर्धा जिंकली?”, असा प्रश्न विचारतो. त्यावर “महाराष्ट्राची सुगरण जोडी”, असे उत्तर नील देतो.

हेही वाचा : Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

यश पुढे अरुंधतीनंतर संजनाबद्दल प्रश्न विचारत म्हणतो की, संजनाच्या मुलाचं नाव काय? त्यावरसुद्धा नील पटकन, निखिल, असे उत्तर देतो. पुढचा प्रश्न देशमुख कुटुंब राहतं, त्या घराचं नाव काय, असा असतो. त्यावर नील, समृद्धी, असे उत्तर देतो. पुढे समृद्धी बंगला मुंबईत कुठे आहे? त्यावर नीलला उत्तर देता येत नाही. पुढे श्रेया बराच विचार करून, याचे उत्तर बोरिवली, असं देते. मजेशीर प्रश्नोत्तरांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Story img Loader