‘आई कुठे काय करते’ मालिकेतील लेखिकेने १६ दिवसांपूर्वी वडील गमावले, आता आईचंही निधन

“तुझ्या दुःखाची कल्पनाच करवत नाही.”

aai kuthe kay karte
आई कुठे काय करते

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेतून एक हाऊसवाइफ ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेची लेखिका नमिता वर्तकचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर आता १३ दिवसांनी तिच्या आईचेही निधन झाले आहे. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळींनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी हे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. या मालिकेमध्ये ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचेही पाहायला मिळते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शूटींगदरम्यानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट

मिलिंद गवळींची पोस्ट

“खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये,
जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत,
आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी असतात आणि खूप काहीही असतं. जे कधीच नाही दिसत,
आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं,
सिरीयल चा 23 – 24 मिनिटाचा एपिसोड साठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसस नाही,
दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मघ परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.
बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो,
पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल , उलथा पालत होत असेल तर,
“आई कुठे काय करते “ च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले, 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली,
नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही,
आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक.
हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर..
हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असे मिलिंद गवळींनी म्हटले.

आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

मिलिंद गवळींच्या पोस्टमध्ये अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. ‘तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘ही मालिका बंद करू नका’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘देव त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो’, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:32 IST
Next Story
Video: “गरबा स्टेप वाटली…” दीपाने ‘बहरला हा मधुमास’वर केलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Exit mobile version