Bigg Boss Marathi 5 Grand Finale: ७० दिवस प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यावर बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आज निरोप घेत आहे. आज बिग बॉस मराठीचा धमाकेदार ग्रँड फिनाले पार पडतोय. थोड्याच वेळात या पर्वाचा विजेता कोण होईल, ते सर्वांना कळेल. या ग्रँड फिनालेमध्ये सर्व एलिमिनेटेड स्पर्धकांना बोलावण्यात आलंय पण एका स्पर्धकाला मात्र बोलावण्यात आलेलं नाही, ज्याची चांगलीच चर्चा होत आहे.
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे बिग बॉसच्या घरातील टॉप ६ सदस्य आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये घराबाहेर गेलेले पुरुषोत्तमदादा पाटील, घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, वर्षा उसगांवकर, संग्राम चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, योगिता चव्हाण, निखिल दामले हे सर्व स्पर्धक आले आहेत, पण यात आर्या जाधवचा समावेश नाही.
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live: वाचा अपडेट्स एका क्लिकवर
शनिवारच्या एपिसोडमध्ये टॉप ६ सदस्यांचे घराबाहेर गेलेल्या स्पर्धकांशी रियुनियन झाले. या रियुनियनमध्येही आर्या जाधव नव्हती, तसेच आज फिनाले एपिसोडमध्येही आर्या नाही. आर्या घरातून एलिमिनेट झाली नव्हती तर तिला बिग बॉसच्या खेळातील एक महत्त्वाचा नियम मोडल्याप्रकरणी निष्कासित करण्यात आलं होतं.
“धनंजय अतिशय पोरकटपणे वागत होता”, वर्षा उसगांवकरांना डीपीचं खटकलं वागणं, म्हणाल्या, “अंकिताचा वकील…”
आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली होती, त्यानंतर घरात हिंसा केल्याप्रकरणी आणि नियम मोडल्याप्रकरणी तिला निष्कासित करण्यात आलं होतं. तिला जाताना घरातील सदस्यांना भेटता आलं नव्हतं, मंचावरही जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिला रियुनियन व ग्रँड फिनालेला बोलावण्यात आलं नाही.
दरम्यान, बिग बॉसच्या ग्रँड फिनालेबद्दल बोलायचं झाल्यास आता घरात टॉप ५ स्पर्धक आहेत. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.