Aarya Jadhao on Returning Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे. या शोमध्ये अमरावतीची रॅपर आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात मारली, त्यानंतर आर्याला बिग बॉसने बाहेर काढलं. बिग बॉसच्या या निर्णयानंतर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच शनिवारी बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या आर्याने आज इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, चाहत्यांशी संवाद साधला.

आर्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन तिला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचे, चाहत्यांचे आभार मानले. तसेच आर्याने निक्कीवर हात उचलला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हेही आर्याने सांगितलं. तसेच निक्की खूप वाईट गेम खेळत आहे. गेम खेळताना सात आठवड्यात मलाही बरेचदा लागलं होतं, असंही आर्या म्हणाली. आर्याने निक्कीच्या आईला उत्तर दिलं. “आमची मुलगी मार खायला गेली आहे का,” असं निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या होत्या. “काकू आम्हीही मार खायला नव्हतो गेलो” असं आर्या निक्कीच्या आईला म्हणाली.

Aarya Jadhav
“त्याचे खायचे दात वेगळे…”; आर्याने मोजक्या शब्दात सांगितलं, म्हणाली, “निक्की वेडी…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
bigg boss marathi aarya slaps nikki controversy project head ketan mangaonkar
आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”
aarya jadhao on her wild card entry in Bigg boss marathi 5
बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर चॅनलने संपर्क केला का? आर्या जाधवने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…
aarya jadhao rap and angry reaction on nikki tamboli
Video : “कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया…”, घराबाहेर येताच आर्याने रॅपमधून मांडलं रोखठोक मत! एकदा ऐकाच…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
riteish deshmukh enters in the house and open the fridge
‘बिग बॉस’च्या घरात येताच रितेश देशमुखने उघडला फ्रिज अन् पाहिली ‘ती’ गोष्ट; सगळेच खळखळून हसले, नेमकं काय घडलं?
bigg boss marathi aarya eliminated from the house
“निक्की ६ आठवडे त्रास देतेय, तिची भाषा…”, आर्याला Eliminate केल्यावर पुष्कर जोग संतापला! म्हणाला, “ती चुकली, पण…”

Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…

आर्या पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार का?

आर्याने या लाइव्ह सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी तिला एका चाहत्याने पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का? असं विचारलं. त्यावर आर्याने उत्तर दिलं. “नक्कीच पुन्हा बिग बॉसमध्ये जाईन,” असं आर्या म्हणाली. आर्या सध्या तरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे, पण पुन्हा तिला या पर्वात संधी दिली जाणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

आर्या जाधवला निक्कीला मारल्याप्रकरणी बिग बॉसने घरातून निष्कासित केलं. आर्याने केलेल्या कृतीनंतर सोशल मीडियावर काही चाहते आर्याचं समर्थन करताना दिसले होते, तर काहींनी या कृतीचा निषेध केला होता. “मी हात उचलणे ही कृती योग्य नव्हती. ती एकप्रकारची हिंसा आहे,” असं आर्याने या लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं आहे.