scorecardresearch

Video: मैत्री तुटली! एमसी स्टॅनबद्दल स्पष्टच बोलला अब्दू रोझिक; म्हणाला, “त्याच्यामुळे माझ्याबद्दल…”

एमसी स्टॅनबरोबरची मैत्री तुटली आहे, असं अब्दू रोझिक म्हणाला.

abdu rozik mc stan video
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस १६’ मधील दोन सदस्य अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये दुरावा आला आहे. दोघांमध्ये काही आलबेल नसल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. या चर्चांवर अब्दू रोझिकने शिक्कामोर्तब केलंय. एमसी स्टॅनबरोबरची मैत्री तुटली आहे, असं अब्दू रोझिक म्हणाला.

“मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…”

“एमसी स्टॅनमुळे माध्यमांमध्ये माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे आता मला स्टॅनबद्दल काहीही बोलायचं नाही, तसेच त्याच्याबद्दलही बोलायचं नाही, आमची मैत्री संपली. तो माध्यमांमध्ये मी वाईट आहे, असं म्हणतोय, त्यामागचं कारण मला माहीत नाही. पण आता मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही,” असं अब्दु रोझिक ‘व्हिरल भयानी’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणतोय.

दरम्यान, अब्दू रोझिकने आपल्याला गाण्याचं प्रमोशन करण्यास सांगितलं होतं, असं स्टॅन म्हणाला होता. तर अब्दूने मात्र हा दावा फेटाळला होता. तसेच तो आपले फोन उचलत नसल्याचंही अब्दू म्हणाला होता. अशातच स्टॅनशी मैत्री तुटली आहे, असं आता अब्दूने स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या