Abhijeet Chavan buy new home and car: सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा वापर सामान्यांसह अनेक कलाकार करत असतात. मनोरंजन, व्यवसाय, जाहिरात, विविध विषयांवरील माहिती, देशाच्या-जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रसिद्ध ठिकाणे, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध पद्धतीचे जेवण, ते बनवण्याच्या पद्धती, हवामान या आणि अशा असंख्य गोष्टी या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
इतकेच नाही, तर अनेक जण विविध कला सादर करतात. काहीजण त्यांच्या दररोजच्या आयुष्यात काय चालले आहे हे सांगतात. या माध्यमातून अनेक लोक त्यांच्याशी जोडले जातात.
कलाकारही त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या मालिका, चित्रपट, नाटक याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील खास क्षणही ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. आता अभिनेते अभिजीत चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अभिजीत चव्हाण यांनी घेतलं नवीन घर आणि कार
अभिजीत चव्हाण यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी नवीन गाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी महिंद्राची EV कार घेतली आहे. ते कुटुंबासह शोरूममध्ये गेले होते. त्यांनी गाडीची पूजा केली. नारळ फोडला, गाडीला हार घातला.
व्हिडीओमध्ये पुढे अभिजीत चव्हाण गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी गाडीचे, गाडीबरोबर कुटुंबासह फोटोही काढल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिजीत चव्हाण यांनी लिहिले, “गेलेलं वर्ष हे खूप वाईट होतं म्हणून मी स्वत:चे लाड करण्यासाठी नवीन घर आणि नवीन कार घेतली आहे, गणपती बाप्पा मोरया” असे लिहित त्यांनी नवीन घर घेतल्याचेही सांगितले.
त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने अभिनंदन असे लिहिले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी बाप्पा मोरया असे लिहित शुभेच्छा दिल्या आहेत; तर अनेक चाहत्यांनी खूप अभिनंदन असे लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. “खूप खूप अभिनंदन”, “बाबा, खूप अभिनंदन”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

अभिजीत चव्हाण यांना बाबा चव्हाण या नावानेही लोक ओळखतात. दरम्यान, अभिजीत चव्हाण यांच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या ते मुरांबा मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. शशिकांत मुकादम ही भूमिका त्यांनी साकारली आहे. मालिकेच्या सुरुवातीला ते नकारात्मक भूमिकेत दिसत होते. पत्नीला त्रास देणारे, वर्चस्व गाजवणारे असे ते होते; त्यामुळे मुलगा अक्षय आणि शशिकांत मुकादम यांच्यात मतभेद आणि दुरावा पाहायला मिळाला. मात्र, आता त्यांच्या स्वभावात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय आणि शशिकांत मुकादम यांच्या नात्यात जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
