‘मोहब्बते लुटाऊँगा’, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘क्या तुजे पता है’, अशा अनेक गाण्यांसाठी अभिजीत सावंत ओळखला जातो. अभिजीत सावंत ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनचा विजेता आहे.

अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वात सूरज चव्हाण विजेता तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. अभिजीत सावंतने त्याच्या खेळाने सर्वांचे मन जिंकले होते. आता तो त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत तो लग्नानंतर टिंडर डेटिंग अॅप वापरत होता, असा खुलासा त्याने केला आहे.

माझ्या पत्नीला याबद्दल…

अभिजीत सावंतने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत टिंडर अॅप वापरण्याबाबत अभिजीत सावंत म्हणाला, “मला गोष्टींबाबत उत्सुकता असते. मी माझ्या मित्रांबरोबर अमेरिकेत होतो. माझा मित्र म्हणाला की हे नवीन अॅप आले आहे, हे डेटिंगसाठी वापरतात. त्यावेळी त्या अॅपवर प्रोफाइल तयार केले. ते तसेच होते. मी कधीतरी त्या अॅपवर जायचो, तिथे कशाप्रकारे गोष्टी घडतात हे मी बघायचो. मी माझ्याच नावाने प्रोफाईल वापरत होतो. माझ्या पत्नीला याबद्दल माहीत नव्हते. पण, मी कोणाला भेटलो नाही किंवा डेट केले नाही.

पुढे अभिजीत सावंत खुलासा करत म्हणाला, “टिंडरच्या प्रोफाईलवर मॅच यायचे, तर बोलायचो. मला लोकांशी बोलायला आवडतं आणि मुलींशी तुम्ही बऱ्याच विषयांवर गप्पा मारू शकता. दोन-तीन जण टिंडरवर असे होते, ते चांगलं बोलत होते. त्यानंतर ट्विटवर सगळीकडे आलं की मी टिंडर वापरतो. माझ्या पत्नीला याबद्दल माहीत नव्हतं. आता तिला याबद्दल माहीत होईल. ते चांगलं वाटणार नाही. जर तुम्हाला काहीतरी करायचे आहे तर न भिता केले पाहिजे. हे सर्व मी कसं हाताळू शकणार होतो?”, असे म्हणत लग्नानंतर टिंडर अॅप तो उत्सुकता म्हणून वापरत होता, असे वक्तव्य त्याने केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत सावंत व शिल्पा यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा प्रेमविवाह आहे. त्यांना दोन मुली आहेत. बिग बॉस मऱाठीच्या पाचव्या पर्वात जेव्हा अभिजीत सावंत स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता, त्यावेळी त्याची पत्नी व त्याच्या मुली त्याला पाठिंबा देताना दिसल्या होत्या. अभिजीतने अनेकदा त्याच्या पत्नीचे कौतुक केले आहे, तिच्याविषयी प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. अभिजीत सावंत सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसतो. त्याच्या कॉन्सर्टलादेखील प्रेक्षकांची गर्दी असते. अभिजीत सावंतचा मोठा चाहतावर्ग आहे.