Abhijeet Sawant Shared Romentic Post : ‘मोहब्बते लुटाउंगा’ म्हणत अनेकांच्या मनात आपल्या सुमधुर आवाजानं घर करणारा प्रसिद्ध गायक म्हणजे अभिजीत सावंत. अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. त्यामध्ये त्यानं त्याच्या गोड आवाजानं अनेकांना भुरळ पाडली आणि या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा मान मिळवला. त्यानंतर अभिजीत लोकप्रिय गायक म्हणून समोर आला. अभिजीत गायनासह सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो.
अभिजीत सावंत अनेकदा त्याच्या गाण्यांचे रील, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत त्याच्या आगामी कामाबद्दलची माहिती चाहत्यांसह यामार्फत शेअर करीत असतो. त्यासह तो त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टीदेखील यामार्फत शेअर करीत प्रेक्षकांच्या संपर्कात राहतो. अभिजीत सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून, गेले अनेक दिवस तो त्याच्या परदेश दौऱ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत आहे.
अभिजीत त्याच्या कुटुंबीयांसह पॅरिस, स्वित्झर्लंड येथे फिरायला गेलेला त्यानं पोस्ट केलेल्या व्हिडीओंमधून हे पाहायला मिळतं. अशातच त्यानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट खास असून, त्यामध्ये त्याच्या बायकोबरोबरचे फोटो गायकानं शेअर केले आहेत. अभिजीतनं त्याची बायको शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करीत रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिजीतनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो व शिल्पा आयफेल टॉवरखाली एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तर यासह अभिजीतनं शिल्पाबरोबरचे इतर काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. अभिजीतनं या फोटोंना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिजीतनं पोस्ट केलेल्या या फोटोंखाली त्याच्या चाहत्यांनीसुद्धा शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शिल्पा व अभिजीतबद्दल बोलायचं झालं, तर या जोडीनं ३ डिसेंबर २००७ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर या जोडीनं दोन मुलींना जन्म दिला. अभिजीतच्या संघर्षकाळात शिल्पानं त्याला खंबीरपणे साथ दिली. ‘इंडियन आयडॉल’ जिंकल्यानतंर त्याला खऱ्या अर्थानं मोठा ब्रेक मिळाला. अभिजीत ‘बिग बॉस’मध्ये असताना शिल्पा त्याला भेटायला गेली होती. तर, अभिजीत व शिल्पा सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत असतात.