अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. तो नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. नुकताच त्याचा 'घूमर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच ज्युनियर बच्चन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. नुकताच या नवीन भागाचा प्रोमो समोर आला. यामध्ये अभिषेक बच्चन आणि या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यामी खेर या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून सहभागी झालेले दिसले. हा प्रोमो समोर येताच प्रचंड चर्चेत आला. याचं कारण म्हणजे यामध्ये अभिषेक बच्चन याने त्याचे वडील अमिताभ बच्चन मिसळ खातात की नाही याचा खुलासा केला आहे. आणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क या प्रोमोमध्ये अभिषेक त्याला मामलेदारची मिसळ आवडत असल्याचं सांगताना दिसत आहे. तर यानंतर त्याला निलेश साबळे थेट मिसळ आणून देतो आणि अभिषेकही ती मिसळ अगदी चव घेत खातो. अभिषेकला मिसळ खाताना पाहून निलेश साबळे त्याला विचारतो, "वडिलांनी ही मिसळ खाऊन पाहिली का?" त्यावर अभिषेक म्हणतो, "नाही नाही. सगळी मिसळ मीच खाऊन टाकतो. त्यांच्यासाठी काही शिल्लक राहातच नाही." आणखी वाचा : “अभिषेक-करिश्मा यांचं लग्न मोडलं कारण…” दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी २० वर्षांनी केला खुलासा याच याचबरोबर लहानपणी अभिषेक बच्चन दादा कोंडके यांचे चित्रपट पाहायचा असा खुलासाही तयाने केला. हा मजेदार भाग २१ ऑगस्ट रोजी प्रसारित होईल.