Marathi Actor Abhishek Gaonkar : यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी साखरपुडा, लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. यादिवशी ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा साखरपुडा देखील पार पडला होता. आता लवकरच हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण पार पडलं.

‘सारं काही तिच्यासाठी’ ही ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यामध्ये अभिषेक गावकरने श्रीनू ही भूमिका साकारली आहे. अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर केले होते. यानंतर यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा पार पडला आता दोघांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झालेली आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: अधिपतीची जन्मदात्री चारुलता अक्षरासमोर, तर भुवनेश्वरी…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवं वळण
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
zee marathi new serial prapti redkar will appear in Savlyachi Janu Savali upcoming serial
Video: ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा जबरदस्त नवा प्रोमो
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
Khushboo Tawde Baby Shower Video Out Titeeksha Tawade share on her youtube video
Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Tula Shikvin Changalach Dhada Upcoming Episode Charulata will enter Suryavansi house Watch Promo
Video: सूर्यवंशी कुटुंबाची खरी लक्ष्मी करणार गृहप्रवेश, पण दुसऱ्याबाजूला घडणार ‘ही’ धक्कादायक घटना
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

हेही वाचा : Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…”

सोनालीने त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली-अभिषेकचं पहिलं केळवण सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं. यातील एका व्हिडीओमध्ये सोनाली आणि अभिषेक एकमेकांना केक भरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या पहिल्या केळवणाचे फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आले आहेत.

अभिषेक गावकरची होणारी बायको आहे तरी कोण?

अभिषेक गावकरची होणारी बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या रील्सला मिलियनच्या घरात व्ह्यूज असतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता लवकरच अभिषेक आणि सोनाली लग्नबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा…”, योगिताच्या नवऱ्याची खरमरीत पोस्ट; म्हणाला…

Abhishek Gaonkar
अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण ( Abhishek Gaonkar )

हेही वाचा : Video : अक्षया देवधरने दाखवली साड्यांच्या व्यवसायाची पहिली झलक! पाठकबाईंनी राणादासह केली नव्या दालनाची पूजा

Abhishek Gaonkar
अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण ( Abhishek Gaonkar )

अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. यापूर्वी त्याने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देखील काम केलेलं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘माझी माणसं’ अशा विविध मालिकांमध्ये तो यापूर्वी झळकला आहे.