Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये अनेक गोष्टींवरुन वादविवाद, मतभेद होत असलेले दिसतात. ज्या स्पर्धकांमध्ये उत्तम मैत्री आहे, त्यांच्यातही फूट पडताना दिसू शकते. या घरातील समीकरणे दररोज बदलताना दिसतात. त्यामुळे कधी कोणती गोष्ट घडेल, कोणत्या वेळी भांडणे होतील, हे सांगता येत नाही.

सध्या बिग बॉस मराठीचे सहावे पर्व चांगलेच चर्चेत आले आहे. विविध कारणांमुळे या पर्वाची, यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची चर्चा होताना दिसते. कलर्स मराठी वाहिनी बिग बॉस मराठीचे विविध प्रोमो सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे दररोज पुढे काय होणार आहे, याची झलक त्यामधून दिसते.

आता कलर्स मराठी वाहिनीने नुकताच शेअर केलेला एक प्रोमो लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की संकेत व राखीमध्ये जोरदार भांडण झाले आहे.

“तू मला माझी मर्यादा…”

राखी मोठ्या आवाजात संकेतला म्हणते, “तू चीटर आहेस”, त्यावर संकेतही चिडून म्हणतो, “मी काय चिटिंग केली आहे, हे सांग”, त्यावर राखी म्हणते, “तू चीटर आहेस, तू मुली पटवतो.” याचदरम्यान, राखी त्याला तुझं लग्न झालं आहे, असे म्हणताना दिसते.

राखीच्या बोलण्यामुळे संकेत चिडतो. तो तिला म्हणतो, “उगाचचं फालतूगिरी करू नकोस.” तरीही राखीला त्याला तू चीटर आहेस असे म्हणत राहते. दोघांमधील भांडण वाढताना दिसते. संकेत तिला म्हणतो, “तू मला माझी मर्यादा ओलांडायला लावू नकोस.” दोघे एकमेकांना गप्प बस म्हणतात. इतर सदस्य त्यांची भांडण सोडवण्यासाठी मध्ये येतात. संकेत तिथून आता बघ असे म्हणत निघून जातो. इतर स्पर्धक ओरडल्याचा आवाज ऐकायला येतो. भांडणादरम्यान राखीने पायातील चप्पल हातात घेतल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले.

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “राखी संकेतवर आरोपांचा मारा करणार, घराचं तापमान वाढणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी म्हणाले…

या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “राखी शो”, दुसऱ्याने लिहिले, “ही राखी काय आहे? फुल ड्रामा”, आणखी एकाने लिहिले, “राखी आहे, म्हणून बिग बॉस चालू आहे”, एकाने लिहिले, “खरं आहे, बिग बॉस नाही राखी सावंत शो आहे . राखी सावंत विजेती आहे’, आणखी एकाने लिहिले, “राखी माणसं ओळखण्यात चूक नाही करू शकत”, एकाने लिहिले, “सगळ्याचा कार्यक्रम करते राखी फुल पैसे वसूल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता बिग बॉसमध्ये नेमकं काय घडणार, संकेत व राखीमधील भांडण मिटणार की वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.