scorecardresearch

“कठोर निर्णय घ्यावे लागले”, अद्वैत दादरकरने सोडलं ‘झी मराठी’चं मुख्य पद, पोस्ट शेअर करत म्हणाला, “धडपडलो, भांडलो…”

‘झी मराठी’ सोडल्यावर अद्वैत दादरकरची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “जुने दिवस, तो अभिमान…”

adwait dadarkar resigned from zee marathi channel
अद्वैत दादरकरने सोडलं 'झी मराठी'चं फिक्शन हेड पद

अद्वैत दादरकर हा मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेमधील सोहमच्या भूमिकेमुळे अद्वैत घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रत्येक अपडेट अभिनेता त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो.

हेही वाचा : Video : “खोबऱ्याचं सारण, सुंदर कळ्या अन्…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

अद्वैतने नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. २०२२ मध्ये अभिनेत्याने ‘झी मराठी’ वाहिनीसाठी फिक्शन हेडची जबाबदारी स्वीकारली होती. साधारण दीड वर्ष ‘झी वाहिनी’सह काम केल्यानंतर आता अभिनेता अधिकृतरित्या फिक्शन हेडच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करून अद्वैतने माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : “आमच्या घरी गणपती बसत नाही पण…”, क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पाची ओढ; नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

अद्वैत दादरकरने सोडलं ‘झी मराठी’चं फिक्शन हेड पद, पाहा पोस्ट

झी मराठी…हे माझ्यासाठी चॅनल नाही..Emotion आहे आणि यापुढेही असेल. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कधी Corporate Job करेन..पण ९ मार्च २०२२ ते १९ सप्टेंबर २०२३…साधारण दीड वर्ष केला बाबा..Zee Marathi – Fiction Head.. एवढी मोठी जबाबदारी..त्यासाठी सर्वात आधी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला म्हणून PM Sir, अमीत सर, निलेश मयेकर, कल्याणी सगळ्यांचे मनापासून आभार…

ह्या संपूर्ण दीड वर्षात प्रचंड काम केलं..कधी थकलो..कधी समाधान मिळालं..कधी यश मिळालं..जास्त अपयशच मिळालं..धडपडलो..भांडलो..वाद घातला..कधी कठोर निर्णय घ्यावे लागले..ह्या सगळ्यात एक माणूस म्हणून घडलो..हे सगळे अनुभव..नवीन जग..गोष्ट सांगण्याची प्रत्येक वेळेला नवीन पद्धत शोधणं..गोष्टीच्या..पात्रांच्या..त्यांच्या भावनांच्या खोलात शिरून..प्रेक्षकांना खरेपणाचा..अस्सल अनुभव देण्यासाठी झी मराठी नेहमीच झगडते तसे आम्ही सुद्धा झगडलो..ही सगळी माणसं माझ्या नुसती आयुष्यात आली नाहीत..तर आयुष्याचा भाग बनली..आणि शेवटी आठवणी माणसच तयार करतात..ह्या दीड वर्षातल्या काही आठवणी..पण झी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या प्रत्येकाला thank you so much.. आणि fiction team तुम्हाला विशेष thanks..तुम्ही सुद्धा तुमचा बॉस म्हणून मला अगदी सहज स्वीकारलत..खूप miss करेन सगळ्यांना..आत्ता प्रत्येक whatsapp group मधून बाहेर पडताना सुद्धा हात जड झाले काही सेकंद.. डोळ्यात पाणी आलच..पण आपण टीम म्हणून एकत्र केलेलं काम.. मजा मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन..कधी कोणाला दुखावलं असेन तर Sorry आणि ह्या संपूर्ण गोड अनुभवासाठी सगळ्यांचे मनापासून आभार..मला खात्री आहे..लवकरच झी मराठीचे जुने दिवस..तो अभिमान..सगळं परत येईल..All the best आणि मी मराठी..झी.मराठी..

हेही वाचा : सायली अर्जुनला शिकवणार मोदक, ‘ठरलं तर मग’च्या गणेशोत्सव विशेष भागात काय होणार? जुई गडकरीने केला खुलासा

दरम्यान, अद्वैत दादरकर नुकतीच प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या नव्या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 15:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×