scorecardresearch

Video : “मी एखादा फोटो शेअर केल्यावर गौरव लगेचच…” सई ताम्हणकरने केला खुलासा

सईने शेअर केलेल्या या फोटोंवर अभिनेता गौरव मोरे कशी प्रतिक्रिया देतो?

gaurav more, Sai Tamhankar

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सई ही कायमच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. सईने शेअर केलेल्या या फोटोंवर अभिनेता गौरव मोरे कशी प्रतिक्रिया देतो? याबद्दल तिने स्वत: खुलासा केला आहे.

सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत झळकताना दिसते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सई ही तिच्या इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यावर तिच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकार विविध प्रतिक्रिया देताना दिसतात. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सई ताम्हणकर ही गौरव मोरेबद्दल सांगताना दिसत आहे.
आणखी वाचा : …म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

या व्हिडीओत सई ताम्हणकर म्हणते की, “मी जेव्हा जेव्हा एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा मला गौरवची प्रतिक्रिया येते. त्यावेळी तो फक्त Ohhhh असं म्हणतो. तो इतकंच बोलतो. बाकी काहीही प्रतिक्रिया तो देत नाही. त्यामुळे आज तुझा हा परफॉर्मन्स ‘ओहहह’ असा होता, असे म्हणत सई त्याची मस्करी करते.” त्यावर प्रसाद ओक हा ‘मला तर गौरव फॉलोही करत नाही’, असे गंमतीत म्हणतो.

आणखी वाचा : “दादा गुटखा खातात…” कथित बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केल्याने सई ताम्हणकर ट्रोल

दरम्यान सई यावेळी अगदी हावभाव करत सांगताना दिसत आहे. तिचे हे हावभाव पाहून अनेकजण पोट धरुन हसताना दिसत आहे. विशेष म्हणजे गौरव मोरे, समीर चौगुले, प्राजक्ता माळी, वनिता खरात हे कलाकारही यात दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 20:13 IST
ताज्या बातम्या