लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्नील मयेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला. नुकतंच अभिनेता कपिल होनरावने भावूक होत त्याला श्रद्धांजली वाहिली.
लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी (४ एप्रिल) पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वप्नीलच्या आगामी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने एक्झिट घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : मुंबई: दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मल्हारचे पात्र साकारणार अभिनेता कपिल होनराव याने नुकतंच त्याच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. कपिलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने स्वप्नीलचा एक फोटो पोस्ट करत त्यावर ‘RIP’ असे लिहिले आहे.
“अजून खूप काम सोबत करु बोललास आणि फिल्म रिलीजच्या आधीच असा अचानक निघून गेलास”, अशी पोस्ट कपिलने केली आहे. त्याबरोबर त्याने “खूप लवकर गेलास, तुझी फिल्म उद्या प्रदर्शित होणार आहे”, असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर
दरम्यान स्वप्नील मयेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. स्वप्नील यांनी यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मोजक्याच कामातून त्यांनी मराठी इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे.