हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्रा हा नेहमीच चर्चेत असतो. कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे करण चर्चेत असतो. अशातच आता करणने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाची नाही तर गृहप्रवेशाची. करणने नुकतंच मुंबईतल्या बांद्रा येथील नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या या नव्या घरातील गृहप्रवेशाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Devendra Fadnavis should become heir of pm Narendra Modi and lead country says vijay wadettiwar
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
CIDCO houses expensive navi mumbai, president Sanjay Shirsat
घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी

गेल्या वर्षी करणने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेलं हे नवं घर खरेदी केलं होतं. त्यानंतर यंदा त्यानं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ आणि फोटोमध्ये करण होम-हवन, पूजा करताना दिसत आहे. तसेच यामध्ये करणच्या नव्या घरातील लिव्हिंग रुम, बेडरूम आणि प्रशस्त किचन पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

करणचं नवं घर बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये १२व्या मजल्यावर आहे. विशेष म्हणजे या नव्या घरात खासगी लिफ्ट आणि स्विमिंग पूल आहे. या घराची किंमत कोणी १४ कोटी तर २० कोटी म्हणत आहे.

हेही वाचा – Video: जेसीबीनं सासरी पोहोचली राखी सावंत; व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले, म्हणाले, “कोणीतरी जाऊन तो जेसीबी उलटा करा”

दुसऱ्या बाजूला या गृहप्रवेशाच्या वेळी करणची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश दिसत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. करण या गृहप्रवेशाच्या वेळी आपल्या कुटुंबियांबरोबर दिसत आहे.

हेही वाचा – Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क

दरम्यान, करणच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर, लवकरच तो ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात करण व्यतिरिक्त भूमी पेडणेकर, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, प्रद्युमन सिंग मॉल, नताशा रस्तोगी, शेहनाज गिल, अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ६ ऑक्टोबर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader