"...म्हणून मला 'पठाण' पाहता आला नाही" किरण मानेंनी सांगितले कारण | Actor Kiran Mane share facebook post for Shah Rukh Khan Pathaan movie nrp 97 | Loksatta

“…म्हणून मला ‘पठाण’ पाहता आला नाही” किरण मानेंनी सांगितले कारण

अभिनेते किरण माने यांनी पठाणसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

kiran mane Pathaan movie

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला शाहरुख प्रेमी गर्दी करत आहेत. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच दमदार कमाई केली आहे. शाहरुखचे चाहते चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे कौतुक करत आहेत. त्यातच आता अभिनेते किरण माने यांनी पठाणसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेते किरण माने हे शाहरुख खानचे चाहते आहेत. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी शाहरुखचा एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : किरण मानेंची गौरव मोरेसाठी खास पोस्ट, म्हणाले “गौऱ्यांचं एकबी स्कीट…”

किरण मानेंची पोस्ट

“… आज खरंतर फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा ठरवलावता भावा ! पन अचानक मुंबैवरनं सातारला यायला निघावं लागलं. पन आज नायतर उद्या, तुला बघनार. पाच वर्ष वाट बघायला लावलीस. आता दम निघंना. मोठ्या पडद्यावरच्या तुझ्या एन्ट्रीला नक्की डोळे पानावनार… तू हायेसच तसा… नादखुळा… कितीबी संकटं आली तरी ती अंगावर घिवून, धोबीपछाड मारून नेस्तनाबूत करनारा. राॅक साॅलीड ! तुला बघून आमच्या संघर्षाला शंभर हत्तींचं बळ मिळतं. ‘पठाण’बी तुझ्यागतच असनार… जबराट…भन्नाट… जाळ…धूर… तुझ्या यशासाठी आभाळभर शुभेच्छा. लब्यू”, असे किरण मानेंनी या पोस्टमध्ये म्हटले.

आणखी वाचा : मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील फरक काय? आदेश बांदेकरांचा लेक म्हणाला…

दरम्यान किरण माने हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही हजेरी लावली होती. ते बिग बॉसच्या घरात टॉप ३ स्पर्धकांपैकी एक होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी साताऱ्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:53 IST
Next Story
“…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवाली परबचा व्हिडीओ चर्चेत