अभिनेते मिलिंद गवळी यांचे लाखो चाहते आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मिलिंद सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कामासंदर्भात तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. आताही त्यांनी पोस्ट शेअर करत एक खुलासा केला आहे.
आणखी वाचा – गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…
मिलिंद यांनी एका वेबसीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. त्यांनी पोस्टद्वारे याचा खुलासा करत त्यांच्या कामाबाबत भाष्य केलं आहे. मिलिंद म्हणाले, “एका नव्या वेबसीरिजसाठी मला नुकताच कास्टिंग दिग्दर्शकाचा कॉल आला. (गेल्या काही महिन्यांतील नववा कॉल). मुख्य भूमिकेसाठी हा कॉल होता. त्यांनी या वेबसीरिजची कथा व त्यामधील माझ्या भूमिकेचं सुंदर वर्णन केलं. ते ऐकून कोणताही अभिनेता या कथेच्या प्रेमात पडेल.”
“कोणत्याही प्रोजेक्टमध्ये कलाकाराला मुख्य भूमिका हवी असते. जर त्याला ती मुख्य भूमिका मिळाली तर तो कलाकार आपलं शंभर टक्के काम देण्याचा प्रयत्न करतो. ती भूमिका तो कलाकार जगतो. पण मी पुन्हा ऑडिशन दिलेलं नाही. कारण मी आता ‘आई कुठे काय करते’ शिवाय दुसरा कोणताही प्रोजेक्ट करणार नाही.”
आणखी वाचा – Video : भरपार्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्यासह Lip Lock करतानाचा व्हिडीओ समोर, रोमान्सही केला अन्…
“जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा काम मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो प्रॉडक्शन हाऊसला जमा करावा लागायचा. त्यानंतर प्रॉडक्शन हाऊस त्या कलाकार फोन करुन दिग्दर्शकाला भेटण्यासाठी बोलवत असे. तुम्हाला कास्ट करायचं की नाही हे सर्वस्वी दिग्दर्शक ठरवायचा. पण जसा वेळ बदलत गेला तशी कास्टिंगची पद्धत बदलत गेली.” शिवाय ऑडिशन द्यावं लागेल म्हणून मिलिंद यांनी अनेक मोठे प्रोजेक्ट्स करण्यास नकार दिला असल्याचंही या पोस्टद्वारे सांगितलं.