scorecardresearch

Premium

Video : “तू गेल्यावर सगळं घर…”, चिमुकल्या मायराने गणपती बाप्पाला घातलं गोड गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ

मायरा वैकुळने घातलं गणपती बाप्पाला गाऱ्हाणं, व्हिडीओ व्हायरल

actor myra vaikul pray to ganpati bappa
मायरा वैकुळचा गणपती बाप्पाची प्रार्थना करतानाचा व्हिडीओ व्हायरल ( फोटो : मायरा वैकुळ इन्स्टाग्राम )

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीची भूमिका साकारणारी लाडकी मायरा आज घराघरांत लोकप्रिय झाली आहे. मायरा वैकुळने मराठीसह हिंदी मालिकेत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मायराची आई तिचे गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. गणेशोत्सवानिमित्त मायराच्या घरी पाच दिवसांच्या बाप्पाचं आगमन झालं होतं. बाप्पाला निरोप देताना ही बालकलाकार भावुक झाल्याचा गोड व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता इन्स्टाग्रामवर मायराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिच्या लाडक्या बाप्पाला गाऱ्हाणं घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : वर्षा उसगावकरांचं गोव्यातील सुंदर घर पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले, म्हणाले…

Amchya Pappani Ganpati Anala Song Viral Anoter Little girl
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल
Monkey Thief Mobile People Give Frooti Funny Video Viral
माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचं लेटेस्ट व्हर्जन होतंय तुफान व्हायरल…तुम्ही VIDEO पाहिला का?
gautami patil latest photos instagram new post letest photo of gautami patil comments on lavani dance photo
Gautami Patil: पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Little Girls dance on pahun jevla kay
”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना गाऱ्हाणं घालण्याची परंपरा असते. यानुसार बालकलाकार मायरा वैकुळच्या घरी तिने स्वत: बाप्पाला गाऱ्हाणं घालून निरोप दिला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कंगना रणौतने राजकारणात येण्याविषयी मांडलं मत; म्हणाली, “मी एक देशभक्त…”

“गणपती बाप्पा मोरया! आमच्याकडून काही चुकलं असेल, तर तू आम्हाला माफ कर…आज तुझ्या जाण्याचा दिवस आहे पण, आम्हाला वाटतं तू नको जाऊस. तू गेल्यावर सगळं घर सुनं सुनं वाटतं. म्हणून तू आमच्याकडे नेहमीच राहा अशी आमची इच्छा असते. तुला निरोप द्यायची वेळ आलीये…आता तू हॅपी हॅपी जा आणि पुढच्या वर्षी आमच्याकडे खूप दिवस राहा.” अशी मागणी छोट्या मायराने बाप्पाकडे गाऱ्हाणं घालत केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17: अंकिता लोखंडे पतीसह यंदाच्या बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यास सज्ज; खरेदी केले २०० कपडे अन् ‘हा’ प्लॅन…

मायराच्या या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “खूप सुंदर मायरा”, “मायरा तू खूप हुशार आहेस…लव्ह यू बेटा” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, मायराने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर प्रसिद्ध हिंदी मालिका ‘नीरजा एक नई पेहचान’मध्ये लहानपणीच्या नीरजाची प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ‘बिग बॉस’ फेम स्नेहा वाघच्या लहान मुलीची भूमिका साकारली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor myra vaikul pray to ganpati bappa her cute video viral on social media sva 00

First published on: 27-09-2023 at 12:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×