चला हवा येऊ द्या हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातलाच एक म्हणजे अभिनेता डॉ. नीलेश साबळे. नीलेश हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, दिग्दर्शन करत आहे. नीलेशचा चाहतावर्गही मोठा आहे.

सोशल मीडियावर नीलेश मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, नीलेशचा नवा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, नीलेशने इन्स्टाग्रामवर त्याचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. नीलेश २१ वर्षांचा असतानाचा हा फोटो आहे. हे फोटो शेअर करीत त्याने लिहिले, “आज जुने फोटो सापडले, २१ वर्षांचा होतो तेव्हाचे.”

नीलेशची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे हा फोटो बघितल्यावर नीलेशमध्ये अजूनही काहीच बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा- लगीनघाई! प्रथमेश परबला लागली क्षितिजाच्या नावाची हळद, फोटो आले समोर

दरम्यान, काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून नीलेश बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने या चर्चांवर मौन सोडत खुलासा केला आहे. नीलेश म्हणाला, “मी चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनेलने ठरवले, तर हा कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. पण, तब्येतीच्या कारणास्तव मी थोडे दिवस या कार्यक्रमातून बाहेर असेन.”